Pankaja Munde: "खासदार व्हायला गेले अन् आमदार झाले, तुमचीच नजर लागली..." पंकजाताईंना पराभवाचं शल्य!

Parli Assembly Constituency 2024 : आता मी विधान परिषदेत आले आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. माझा आणि धनंजय मुंडे यांचा रोल (भूमिका) आता बदलला आहे. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे.
Pankaja Munde
Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News: लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य अद्यापही भाजपा सरचिटणीस व विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांना आहे. जाहीरसभेत त्यांनी केलेल्या विधानानंतर त्यांचा रोख कुणाकडे होता, याबाबत सध्या बीड जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

"पाच-सहा हजार मतांनी झालेला पराभव हा पराभव असतो का? तुमचीच नजर लागली असं वाटतंय. मी दिल्लीला जाईन, ताई दिल्लीला जाईन, असं सतत घोकत होते. ताई दिल्लीला गेल्यावर मग आम्ही काय करणार, त्या येथे लक्ष देणार नाहीत, असं सगळं यांचं चालल होतं. घ्या मग आता. आले मी परत तिथेच… खासदार व्हायला गेले आणि मी आमदार झाले, तुमचीच नजर लागली” असे पंकजा मुंडे भरसभेत म्हणाल्या.

Pankaja Munde
Santaji Ghorpade Attack: मतदारांच्या भेटी घेऊन घरी परत येताना उमेदवारावर लाठ्या-काठ्यांनी हल्ला ; संताजी घोरपडे गंभीर जखमी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी येथील अर्ध्याहून अधिक लोकांच्या मी पाया पडत होते. काय रे वेंकटेश…? काय दत्ताभाऊ…? असे सांगत आपला पराभव कशामुळे झाला, त्याला कोण जबाबदार, असे काही प्रश्न उपस्थित करीत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे अन् मतदार यांच्याकडे पाहत त्या म्हणाल्या, "तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे,"

“पूर्वी मी विधानसभेत होते आणि ते विधान परिषदेत होते. आता मी विधान परिषदेत आले आहे आणि धनुभाऊ विधानसभेत आहेत. माझा आणि धनंजय मुंडे यांचा रोल (भूमिका) आता बदलला आहे. ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जातील. आमची भूमिका थोडीशी बदलली आहे आणि तुम्हा मतदारांना एकाच बटनात दोन आमदार मिळाले आहेत. तुम्हाला अजून काय पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

Pankaja Munde
Ajit Pawar : अजितदादांच्या 'एजन्सी'चे दुर्लक्ष : पक्ष झाला टीकेचा धनी! ‘स्टार’ प्रचारक कुठे?

पाथर्डी येथील सभेत पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरु आहे. सभेला ऊसतोड कामगार आणि काही मुकादम उपस्थित होते. त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, "ऊसतोड कामगारांचे मुकादम आलेत का?, की गेले कर्नाटकाला.. माझ्या हातात हे महामंडळ दिलं, तर तुम्हाला कुणाच्या पाया पडायची गरजचं लागणार नाही. पण तेच नाहीय ना...पण आता म्हणजे येवढं तर द्या...सभा तर करायला लावतात...महामंडळ तर द्या...पटकन दोन वर्षांत जिकडे-तिकडे करुन टाकते (सही)..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com