Gulabrao Patil, Ashok Chavan  Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Assembly Winter Session : अशोक चव्हाणांनी लक्ष वेधताच मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले 'हे' आश्वासन

Laxmikant Mule

Nanded Politics News : जल जीवन मिशनअंतर्गत संपूर्ण राज्यात पाणीपुरवठा योजनांच्या कामांची गती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील त्रुटी दूर करण्यासाठी विभागीय बैठकींमध्ये सदरहू कामांचा फेरआढावा घेण्याचे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिले आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारी (ता १५) सकाळी विधानसभेत लक्षवेधी सूचनांवरील चर्चेत अशोक चव्हाण यांनी या महत्त्वाच्या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. स्त्रोत नसल्यामुळे अनेक गावातील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. हे स्त्रोत बळकट करण्यासाठी ग्रीडची सुद्धा व्यवस्था आहे. मात्र, काही ठिकाणी ग्रीडची कामे जेमतेम 10 टक्केच पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी संपूर्ण कामाचे अंदाजपत्रकच तयार केलेले नाही. काही गावांमध्ये पूर्ण गावाऐवजी अर्ध्याच गावात पाईपलाईनची कामे झाली आहेत. खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यासाठी तरतूद नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड जिल्हासह राज्यातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. या कामांमधील त्रुटी व अडचणींबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाचे लक्ष वेधले. या कामांमधील त्रुटी आताच दूर केल्या नाहीत तर, कामे पूर्ण झाल्यावर त्यासाठी पैसा शिल्लक नाही, या सबबीखाली ती कामे तशीच अर्धवट राहतील. सुधारित कामांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेकडून शासनाकडे प्रस्ताव सुद्धा आलेले आहेत. ही कामे नेहमी होणारी नाहीत. त्यामुळेच राज्यातील सर्व कामांचा आताच आढावा घेऊन अंदाजपत्रके व कामांचे स्वरूप सुधारित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावेत. नांदेड जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत आलेल्या अडचणींबाबत पुढील आठवड्यात बैठक नियोजित आहे. त्याप्रमाणेच राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील कामांचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT