Waghdari Village : 63 वर्षांपासून महाराष्ट्रातून एक गाव गायब?; गावकऱ्यांकडे मतदान कार्ड, आधार कार्ड आहे, पण...

Waghdari Village Missing From Maharashtra Map : महाराष्ट्राच्या नकाशावर एक गाव आलेच नाही. काय आहे नेमकं प्रकरण?
Waghdari Village
Waghdari VillageSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. शेतकरी, कामगार, कर्मचारी आणि तरुण बेरोजगारांच्या प्रश्नावरून विरोधक राज्य सरकारची कोंडी करत आहेत. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी होत आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून विरोधकांनी सरकारला घेरले. विधिमंडळाच्या अशा तापलेल्या वातावरणात एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील एक गाव चोरीला गेले आहे.

Waghdari Village
Ashok Chavan : ''नुकसान झाल्यानंतर 15 दिवसांनी केंद्रीय पथक येणार असेल, तर...'' ; अशोक चव्हाणांचं विधान!

नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील हे गाव आहे. या गावाचे नाव वाघदरी आहे. तेलंगण सीमेला लागून महाराष्ट्राच्या हद्दीत हे गाव आहे. प्रांतवार रचनेनंतर हे गाव आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 63 वर्षे झाली. पण हे गाव अजूनही राज्याच्या नकाशावर आलेले नाही. विशेष म्हणजे महसूल विभागाकडेही या गावाची कुठलीही माहिती नाही. ( Marathwada News )

राज्याच्या नकाशावर आणि महसूल विभागात गावाची नोंद नसल्याने हे गाव चोरीला गेले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाघदरी गावातील ग्रामस्थांकडे मतदान कार्ड आणि आधार कार्डही आहे. पण गावातील जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीनीची नोंद महसूल विभागाकडे नसल्याने कुणाकडेच जमिनीचा सातबारा नाही. सातबारा नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमासह अनुदानाच्या कुठल्याही योजनांचा लाभ मिळत नाहीये.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सीमा भागात हे गाव असल्याने तिथे सुविधाही नाहीत. गावात जाण्यासाठी रस्ताही नाही. वाघदरीतील गावकऱ्यांना सात किलोमीटर पायपीट करावी लागते. जीव मुठीत घेऊन जंगलातून जावे लागते. ( Maharashtra News ) महसुली नोंद करण्यासाठी वाघदरीचे गावकरी कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. पण प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. तर गावाची आकार बंदी आणि जमिनीची मोजणी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महसुली नोंदीसाठी प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला जाईल, अशी माहिती किनवटमधील सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Waghdari Village
Pankaja On Parli Constituency : परळी मतदारसंघाबाबत पंकजा मुंडे यांचे मोठे विधान; ‘मला अन्‌ धनंजयला...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com