Dhananjay Munde  sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde Birthday Today : बळीराजा चिंतेत, संकटात, मग माझा वाढदिवस कशाला ? कृषीमंत्री मुंडे कार्यकर्त्यांना म्हणाले..

Marathwada News : अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड

सरकारनामा ब्यूरो

Beed : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील नव्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झालं आहे. परळीचे आमदार,राष्ट्रवादीचे आक्रमक नेते धनंजय मुंडे हे कृषीमंत्री झाले आहेत. नवनिर्वाचित कृषीमंत्री मुंडेंचा आज (15 जुलै) वाढदिवस आहे.

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करु नका, असे आवाहन मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. शेतकरी तसेच कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याच्या सूचना या पत्रकात दिल्या आहेत.

मुंडेंच्या वाढदिवसाची जोरदार तयारी त्यांच्या समर्थकांनी केली आहे, पण मुंडेंनी आपल्या वाढदिवसानिमित्त टि्वट करीत सूचना केल्या, यामुळे उत्साही कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

शेतकरी चिंतेत आणि संकटात असताना मी वाढदिवस साजरा करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळं मी सार्वजनिक रित्या साजरा करणार नसल्याचे धनंजय मुंडे यांनी टि्वट करीत स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे दिसते.

मंत्रीपद आणि आजचा वाढदिवस एकत्र साजरा करण्याचे नियोजन अनेक कार्यकर्त्यांनी केले होते. धनंजय मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना सामाजिक न्यायमंत्री होते. परंतु आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना कृषीखातं देण्यात आलं आहे.

धनंजय मुंडे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात..

जनतेचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत. परंतु पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी- बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवून यावर्षी मी वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा न करत करण्याचा निर्णय घेतला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT