Maratha reservation : आरक्षणासाठी मराठा महासंघाचा पुन्हा एल्गार ; 'जंतरमंतर' वर आंदोलन..

Maharashtra : ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यास विलंब लागणार असेल तर धोरणात बदल करा.
Maratha reservation news
Maratha reservation news Sarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळला आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा महासंघ एल्गार पुकारणार आहे.

यासाठी नवी दिल्लीत २५ जुलै रोजी मराठा महासंघातर्फे जतंरमंतर मैदानावर तीव्र आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे पाटील यांनी केले. 

Maratha reservation news
Sanjay Raut on Devendra Fadnavis : तुम्ही राष्ट्रवादीबरोबर केली ती कुटनीती, आम्ही केलं ते काय होतं ? राऊतांचा फडणवीसांना सवाल

मराठा समाजाला आरक्षण तातडीने आरक्षण द्यावे, केंद्र सरकारने सध्याच्या कोणत्याही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी धोरणात बदल करुन मराठा समाजाला ओबीसीतून देऊन आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी मराठा महासंघाची आहे.

"मराठा समाजाला २०१४ मध्ये १६ टक्के व त्यानंतर २०१९ मध्ये १२-१३ टक्के आरक्षण देण्यात आले होते. दोन्ही वेळा ५० टक्केच्या वर मर्यादा वाढवून दिलेले आरक्षण कोर्टात टिकले नाही. त्यामुळे आता ५० टक्केचे आत आरक्षण द्या किंवा घटना दुरुस्ती करा, अशी मागणी मराठा महासंघाने केली आहे," असे संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.

सुप्रिम कोर्टाने महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली याचिका देखील फेटाळली आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर महाराष्ट्रातील मराठा समाज, हरियाणातील जाट समाज, राजस्थानमधील राजपूत समाज, कर्नाटकांचा राज्यू समाज, मनीयार समाज, पटेल समाज, कुर्मी समाज आदी समाजाला सुद्धा आरक्षणाचा फायदा मिळावा हीच मराठा महासंघाची भुमिका आहे.

Maratha reservation news
OBC Reservation : पुन्हा 'तारीख पे तारीख' ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी लांबणीवर

ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यास विलंब लागणार असेल तर धोरणात बदल करा ,मात्र  आरक्षणातून वंचित असलेल्या मराठा समाजासह देशातील सर्व वंचित समाज घटकांना नोकरी, शिक्षण यामध्ये आरक्षण द्यावे. अशी अखील भारतीय मराठा महासंघाची मागणी आहे. ५० टक्केच्या आत आरक्षण असले पाहिजे अशी अशी मराठा महासंघाची मागणी आहे. २५ जुलै रोजी सकाळी नऊवाजेपासून सांयकाळी पाच वाजेपर्यत बैठा सत्याग्रह केला जाणार आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com