Flooded farmlands in Marathwada show the severe crop damage due to heavy rain, highlighting the urgent need for loan waiver and farmer relief. Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar : पाण्यात उतरून पूरग्रस्तांची मदत करणारे खासदार ओमराजे निंबाळकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर संतापले; म्हणाले, 'आश्वासने नको लगेच...'

Maharashtra Farmers Crisis: राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजला आहे. शेतकऱ्यांची उभी पिके आणि शेतीचे भरमसाठ नुकसान झाले. यावर राज्य शासन आता मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. राज्यभरात आणि विशेषत: मराठवाडा विदर्भ येथे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली.

Sampat Devgire

Maharashtra Farmers Crisis : राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजला आहे. शेतकऱ्यांची उभी पिके आणि शेतीचे भरमसाठ नुकसान झाले. यावर राज्य शासन आता मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. राज्यभरात आणि विशेषत: मराठवाडा विदर्भ येथे मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली.

पिके आणि गावे पाण्याखाली गेली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना बांधावर जाण्याच्या सूचना केल्या. यासंदर्भात मराठवाड्यात मोठे संकट कोसळले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे थेट पाण्यात उतरून नागरिकांना मदत करीत आहेत.

तात्पुरत्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. आता सरकारने आपले आश्वासन पाळावे, असे खासदार निंबाळकर म्हणाले. या पार्श्वभूमीवर माजी आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत कर्जमाफीची मागणी केली आहे. या संदर्भात विरोधी पक्ष आता पुन्हा संघटित होऊ लागला आहे.

त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याच्या घोषणा होत आहेत. संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारचे आणि विशेषता केंद्र सरकारचे धोरण शेतकऱ्यांना कफल्लक करीत आहेत. केंद्राच्या धोरणामुळे सोयाबीनचे दर दहा हजारावरून तीन हजारावर आले.

सोयाबीनचे दर 11 हजार वर गेल्यावरच महागाई वाढते का? असा सवाल निंबाळकर यांनी केला. सिमेंटची गोणी अडीचशे रुपये वरून चारशे रुपये होते. तेव्हा सरकार हस्तक्षेप का करीत नाही? त्याने महागाई वाढत नाही का? केंद्राच्या आयात धोरणामुळे सोयाबीनचे दर रसातळाला गेले आहेत. आता सरकारने निवडणुकी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन तातडीने पाळावे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हाच खरा पर्याय ठरेल. कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुरू असलेले आंदोलन हे राजकीय आंदोलन नाही. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला मदत देण्यासाठीचे प्रश्न आहेत. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेतल्यास त्याचे तीव्र परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतील. आत्महत्या असल्या कारणांमुळेच होत असल्याचेही, ओमराजे निंबाळकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT