Maharashtra Heavy Rain : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे. धाराशिव, सोलापूर, बीड, हिंगोली, जालन्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाने रौद्ररूप धारण केलं आहे.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून या आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एनडीआरएफच्या पथकांकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं जात आहे.
बीड आणि धाराशिव जिल्ह्यात तर पावसाने कहर केला आहे. याच पावसाच्या पाण्यात परंड्यातील वडनेर येथेल एक कुटुंब पाण्यात अडकलं होतं. त्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वत: पाण्यात उतरल्याचं पाहायला मिळालं.
ओमराजे निंबाळकर यांनी NDRF सोबत केलेल्या बचावकार्याचा व्हिडिओ एक्सवर शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत वडनेर ता.परंडा येथील नागरिकांचे प्राण वाचविल्याचा मनस्वी आनंद झाल्याचं म्हटलं आहे.
वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व 2 वर्षाचा मुलगा व 2 व्यक्ती रात्री 2 पासून पूर्ण पाण्याने वेढले होते. स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीची वाट पाहत होते.
त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांसोबत ओमराजे निंबाळकर यांनी स्वत: पाण्यात उतरले आणि बचावकार्य केलं. त्यानंतर रात्री 8 वाजता या सर्वांना वाचवण्यात यश आल्याची माहिती खासदार निंबाळकर यांनी दिली.
तर या सर्वांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे मनाला खूप समाधान मिळाल्याचं खासदार निंबाळकर यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. दरम्यान, थेट फिल्डवर उतरून लोकांचे प्राण वाचवल्याच्या त्यांच्या या कृतीचं लोकांकडून कौतुक केलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.