Maharashtra Politics Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Politics: 'तुमचं ठरलं, तर आमचही ठरलं'; धनुष्यबाण, मशाल, तुतारी की घड्याळ

Maharashtra Assembly Elections 2024: लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता वेगवेगळ्या पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालू केली आहे. विधानसभेसाठी पक्षाचे बळ कसे वाढेल, यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करीत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

दिलीप गंभिरे

Dharashiva : धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघात कळंबमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होत आहे. येथे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. येथील बाजार समितीचे सभापती शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी कापसे, पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

१४ सप्टेंबर रोजी परांडा येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. हा पक्ष प्रवेश झालाच तर शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्तेही विविध पक्षात परतीचा प्रवास करण्यासाठी 'तुमचं ठरलं, तर आमचही ठरलं' अशा सोशल माध्यमावर पोस्ट टाकून चँलेंज देत आहेत.

लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता वेगवेगळ्या पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी चालू केली आहे. विधानसभेसाठी पक्षाचे बळ कसे वाढेल, यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करीत आहेत. काही पक्षांनी तर वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी योग्य उमेदवारांचा शोधही चालू केला आहे. असे असतानाच (ठाकरे गट) शिवसेना पक्षाचा गड असलेल्या कळंब शहरात पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मोठी खेळी खेळली आहे.

शहरातील लवकरच अनेक माजी नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, शहरातील शिवसेनेचे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि अनेक पदाधिकारी शिवसेनेत अर्थात धनुष्यबाण हाती घेणार आहेत. पालकमंत्री सावंत यांच्या या खेळीमुळे ठाकरे गटाचे खासदार, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक मात्तबर नेते, कार्यकर्ते (ठाकरे गट) शिवसेनेत तसेच अजित पवार, शरद पवार यांच्या पक्षात परतीचा प्रवास होणार असल्याची शक्यता आहे. शहरातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते, नेते यांच्या पक्ष प्रवेशामुळे पालकमंत्र्यांच्या या खेळीमुळे शिंदे यांच्या शिवसेनेलाही खिंडार पडण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

पालकमंत्री सावंत हे कळंब मधील ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १४ सप्टेंबर रोजी अनेक माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, शाखाप्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहेत. हा प्रवेश म्हणजे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना मोठा राजकीय धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक माजी नगराध्यक्ष, कार्यकर्ते यांची अडचण वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या शहरातील अनेक विभाग प्रमुख, कार्यकर्ते, माजी नगरसेवक यांचा समावेश आहे. यातील माजी नगराध्यक्ष यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण हातात देवून निवडणूक लढविण्याचे आश्वासन पक्ष पातळीवरून दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे, आमदार कैलास पाटील यांच्यावर निष्ठा असणारे शहरातील किती नेते, कार्यकर्ते शिवसेना सोडणार हे कळणार आहे.

शिवाजी कापसे यांचे समर्थक अजित गुरव, जिलानी कुरेशी, विजय पारवे, राजाभाऊ टोपे, नामदेव पौळ, सतीश टोणगे, शिवाजी कदम, विशाल वाघमारे, सुरेश इंगळे, जयसिंग चौधरी, विठ्ठल समुद्रे, राजाभाऊ गरड, तात्या माने, बाबुराव गिरी, कैलास खोपकर, भगवान खैरमोडे, अनिल पवार, सचिन शिंनगारे, सुनील पवार, शंकर खंडागळे, वैभव सुरेश शेळके हे राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT