Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve News : सरकारच्या जुमलेबाजीमुळे महाराष्ट्र दिवाळखोरीत

Maharashtra's move towards bankruptcy, Ambadas Danve's allegation : इलेक्शन जुमल्यांवर पैसे खर्च करत सुटलेल्या महाराष्ट्र सरकारचे आता तोंड झाकले तर पाय उघडे पडतायेत. झालेल्या कामांची चाळीस हजार कोटींची ठेकेदारांची देयके राज्यातील महायुती सरकारने थकवली आहेत.

Jagdish Pansare

Shivsena UBT Political News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारकडून जुमलेबाजीवर कोट्यावधी रुपयांची उधळण केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालायं, असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. जुमलेबाजीमुळे तोंड झाकले तर पाय उघडे पडतात, अशी सत्ताधाऱ्यांची गत झाल्याचा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यात दौरे आणि कार्यक्रमांचा सपाटा सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांनी मात्र सरकारच्या या प्रयत्नांना इलेक्शन काळातील जुमलेबाजी म्हणत टीका केली आहे. शिवसेना नेते (Ambadas Danve) अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र दिवाळखोरीत निघालायं, असे म्हणत महायुती सरकारला सुनावले आहे.

इलेक्शन जुमल्यांवर पैसे खर्च करत सुटलेल्या महाराष्ट्र सरकारचे आता तोंड झाकले तर पाय उघडे पडतायेत. झालेल्या कामांची चाळीस हजार कोटींची ठेकेदारांची देयके राज्यातील महायुती सरकारने थकवली आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास, जल जीवन मिशन, जलसंवर्धन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पालिका, नगरपरिषदा आदी महत्वाच्या विभागांमधील बिलांचा यात समावेश आहे.

लक्षात ठेवा, आज ठेकेदार जात्यात आहेत, तर सरकारी कर्मचारी सुपात. अगदी नजीकच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे या सरकारकडे राहणार नाहीत. (Eknath Shinde) कारण या सरकारने महाराष्ट्र दिवाळखोरीत काढला आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

चोरट्यांना राजाश्रय!

पोलिसांच्या विरोधारील तक्रारींचा निपटारा करण्यास मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तक्रार प्राधिकरण नेमले जाते. या कामासठी एक समितीही नेमली जाते. या समितीवर 'मान्यवर' प्रवर्गातून चक्क लातूर येथे भा. द. वि. कलम 420 अंतर्गत फौजदारी खटला प्रलंबित असलेल्या मिलिंद बिलोलीकर या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातील यादीत नाव नसताना मानधनावर विभागस्तरीय नियुक्ती करण्यात आली, असा दावा करत हे कसे चालते आपल्याला देवेंद्र फडणवीसजी.

आमच्या सरकारच्या काळात असा कसूर आढळला तर त्याला जागेवर दुरुस्त करण्यात येत होते. कायद्याचा आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान करत असाल तर ही नियुक्ती आपण रद्द कराल आणि दिलेले मानधनही वसूल कराल, अशी अपेक्षा व्यक्त करत चोरट्यांनाच सरकारकडून राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT