Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News
Uddhav Thackeray -Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी संपली, वज्रमुठ सुटली ; पण उद्धव ठाकरेंच्या डोळ्यावर पट्टी..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे राजीनामा नाट्य आणि त्यावरून दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेला ड्रामा पाहता राज्यात आता महाविकास आघाडी राहिलीच नाही. ती संपली आहे, त्यांची ती वज्रमुठ देखील सुटली आहे, पण उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर पट्टी आहे, असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी लगावला. प्रसार माध्यमांशी शिरसाट यांनी बारसू रिफायनरी, संजय राऊत, अजित पवार, महाविकास आघाडी संदर्भात भाष्य केले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या डोळ्यावर पट्टी आहे, त्यांना रणभूमीत काय चालंलय ते दिसत नाही, आणि `संजय`, त्यांना काही खरी परिस्थीती सांगत नाही. शरद पवार जेव्हा म्हणतात महाविकास आघाडी (Marathwada) टिकेल तेव्हा निश्चित ती तुटणार हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बारसूमधील रिफायनरीला आता जो विरोध उद्धव ठाकरेंकडून केला जातोय, तो फक्त आपले अस्तित्व दाखवण्यासाठी होतोय.

कुठलाही प्रकल्प एका दिवसात येत नसतो, माझी दिशाभूल केली गेली हे जे ते सांगतायेत, आणि ते मान्य करतायेत की आपली दिशाभूल केली जाते, तर हे याआधी त्यांचे लक्षात का आले नाही? असा सवाल देखील शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उपस्थितीत केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचाराला कशासाठी गेले? अशी टीका ठाकरे गटाकडून केली जाते.

याकडे लक्ष वेधले ते असता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, शिवसेना-भाजप युती असल्यामुळे ते भाजप उमेदवारांच्या प्रचाराला गेले. या आधी उद्धव ठाकरे भाजप उमेदवारांच्या प्रचाराला जात होतेच ना? उद्या माझ्या मतदारसंघात भाजपच्या नेत्यांना प्रचार करावाच लागेल, कारण आमची युती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तिकडे का गेले? या प्रश्नाला काही अर्थ नाही, असेही शिरसाट म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT