Uddhav Thackeray : राज्य सरकारची खुर्ची डगमगायला लागली; बारसुतून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

State Government : शिंदे-फडणवीस सरकार दलालांसाठी काम करतेय
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray in Barsu : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (ता. ६) बारसू परिसराला भेट दिली. त्यावेळी ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही निशाणा साधला. वेदांता-फॉक्सकॉनसारखा प्रकल्प गुजरातला नेला. त्यानंतर पर्यावरणाला हानिकारण ठरणारा प्रकल्प महाराष्ट्राला दिला. चांगले प्रकल्प राज्याबाहेर जाताना सरकार शांत बसले होते. आता बारसू परिसरातील रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करीत आहे. स्थानिक नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार केले जात आहे. मातीची चाचणी घेता तशी लोकांचे मतेही जाणून घ्या. सध्या शिंदे-फडणवीस सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

Uddhav Thackeray
Karnataka Assembly Elections : मल्लिकार्जुन खर्गेंना मारण्याचा भाजपचा डाव ? ; काँग्रेसचा गंभीर आरोप

बारसू (Barsu) परिसरात अनेक परप्रातियांच्या जमिनी आहेत. त्यामुळे येथे काहीतरी कट शिजत असल्याचा आरोपही ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी केला. ते म्हणाले, "हे सरकार उपऱ्यांसाठी दलाली करत आहे. येथे अनेकांच्या जमिनी आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होण्यासाठी या प्रकल्प रेटला जात आहे. त्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून लाठीचार्ज केला जात आहे. यातून हे सरकार (State Government) सामान्यांचे नसून दलालांसाठी काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकल्प झाला नाही तर घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना माघारी कराव्या लागतील. त्यामुळे दलालांसह संबंधितांचे नुकसान होईल. त्यातून कसल्याही स्थितीत हा प्रकल्प मार्गी लावण्याचे काम सरकार करीत आहे."

Uddhav Thackeray
Karnataka Assembly Election News : कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा महाराष्ट्रात...

चांगले प्रकल्प बाहेर आणि राखरांगोळी करणारे प्रकल्प राज्याला दिल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. ठाकरे म्हणाले, "वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला नेला त्यावेळी राज्यसरकार शांत बसले होते. माझ्या काळातील चांगले प्रकल्प गुजरात, दिल्लीला नेले. आता बारसूतील प्रकल्प गुजरातला न्या आणि चांगले प्रकल्प महाराष्ट्राला द्या. आता सरकारमधील लोकांनी माझी दिशाभूल करून बारसू जागेत प्रकल्प होऊ शकतो, असे सांगितले. त्यानंतर मी पंतप्रधानांना पत्र पाठविले. आता त्याच पत्राचे भांडवल केले जात आहे. मात्र हा प्रकल्प करण्यापूर्वी लोकांचे म्हणणे जाणून घ्या."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com