Osmanabad District Bank Election
Osmanabad District Bank Election  Sarkarnama
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्हा बॅंकेत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय; भाजपचे खातेही उघडले नाही..

सयाजी शेळके

उस्मानाबादः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीत भाजपचा दारूण परभाव झाला असून महाविकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. पंधरा पैकी १५ जागा जिंकत महाविका आघाडीने सत्ता राखली. (Osmanabad) शिवसेना-राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीनही पक्षांच्या वाटेला प्रत्येकी पाच जागा आल्या. (Mahavikas Agahdi) भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. (Marathwada)

अखेरच्या टप्प्यात चुरस वाढल्यानंतर प्रचाराच्या तोफा धडाडत होत्या. मात्र महाविकास आघाडीच्या एकोप्याने भाजपचा सुपडा साप झाला आहे. भाजपला एकही जागा मिळाली नसून काही ठिकाणी उमेदवारच न मिळाल्याने यापूर्वीच महाविकास आघाडीच्या जागा बिनविरोध निघाल्या होत्या. गेली महिनाभर गाजलेल्या जिल्हा बँकेचा निकाल सोमवारी (ता. २१) जाहिर झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनमध्ये मतमोजणी झाली. पहिल्या टप्प्यात कळंब येथील विकास सोसायटी मतदारसंघाचा कल शिवसेनेच्या बाजूने लागला. बळवंत तांबारे यांनी ४० मते घेत आघाडी घेतली. याच जागेसाठी महाविकास आघाडीला मोठी कसरत करावी लागली होती. भाजपचे यंग ब्रिगेड मैदानात उतरल्याने चुरस वाढली होती.

अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी निवडणुकीचा ताबा घेऊन मतदारापर्यंत पोहचले. त्यामुळे रंगत वाढली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडीने एकोपा दाखविल्याने भाजपची दाळ शिजली नाही. काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेल्या तुरळक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याची अप्रत्यक्ष हाक मतदारांनी ऐकली नाही. आणि कळंब तालुक्यात शिवसेनेच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय झाला.

याशिवाय उस्मानाबाद विकास सोसायटी मतदारसंघातून नानासाहेब पाटील मोठ्या मताधिक्याने विजय झाले. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा त्यांनी २२ मतांनी पराभव केला आहे. इतरही मतदारसंघात महाविकासआघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली असून भाजपला भोपळाही फोडता आला नाही. महाविकास आघाडीचे पाच उमेदवार बिनविरोध आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीला सत्ता मिळविणे आवाहन नव्हते.

मात्र शिवसेनेच्या अंतर्गत गोटात दुफळीची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे उर्वरीत जागांसाठी काय होते, याकडे सर्वांचे लक्ष होते. ज्ञानेश्वर पाटील (शिवसेना), मधुकर मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस), श्रावण सावंत (शिवसेना),सुनिल चव्हाण (काँग्रेस), बापूराव पाटील (काँग्रेस) यांनी आपल्या मतदारसंघात बिनविरोध वर्चस्व दाखविले होते. मात्र उर्वरीत मतदानासाठी काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस सर्वच जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडल्याने भाजपला मोठी हार पत्करावी लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT