राजकीय विरोधासाठी आमदारांकडून मुक्ताईनगरच्या ५ कोटींची कामांना ब्रेक!

एकनाथ खडसे म्हणाले, विरोधासाठी विकासकामांना आडकाठी करणे योग्य नाही.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama

मुक्ताईनगर : आपण नेहमी विकासकामांसाठी (devolopment) प्रयत्नशील राहिलो. विकासकामांची स्पर्धा केली. त्यात कधी आडकाठी आणली नाही. मात्र आज आमदारांनी (MLA Chandrakant Patil) आडकाठी आणल्यामुळे मूलभूत सुविधा योजनेतंर्गत पाच कोटींच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. विरोधकांनी विकासकामांची स्पर्धा करावी, मंजूर कामांना आडकाठी आणू नये, असा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना नाव न घेता लगावला आहे.

Eknath Khadse
महापालिकेसाठी मास्टरस्ट्रोक; शिवसेना उपनेतेपदी सुनील बागुल

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या निधीतून कुऱ्हा येथे अल्पसंख्याक समाजासाठी शादिखाना हॉलचे बांधकाम करण्यात आले. या सभागृहाचे रविवारी श्री. खडसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

Eknath Khadse
देवेंद्र फडणवीस आज महापालिका निवडणुकीचा बिगुल फुंकणार?

या वेळी रोहिणी खडसे - खेवलकर म्हणाल्या, की नाथाभाऊंच्या प्रयत्नातून उभे राहिलेल्या शादीखाना हॉलच्या माध्यमातून समाजासाठी एक हक्काची जागा उपलब्ध झाली असून, यातून सामाजिक एकता वाढण्यास मदत होईल. कुऱ्हा परिसराच्या विकासात नाथाभाऊ यांचे मोठे योगदान आहे. नाथाभाऊंनी परिसरातील विविध विकासकामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, गेल्या ३० वर्षांत आणि अल्पसंख्याक मंत्री असताना अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देण्याचा आणि विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. समाजाला भरीव निधी दिला, मुक्ताईनगर येथे पॉलिटेक्निक कॉलेज आणले, कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली, बायपासच्या अडचणी दूर झाल्या असून लवकरच निधी उपलब्ध करून काम मार्गी लागेल.

पक्षाची ताकद वाढली

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले, नाथाभाऊ खऱ्या अर्थाने लोकनेते असून, त्यांच्या शब्दाला शासन दरबारी किंमत आहे. त्याद्वारे ते सर्व गोरगरीब जनतेची कामे करत असतात. सकाळपासून त्यांच्याकडे लोकांची गर्दी असते. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली आहे.

या वेळी या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, पंचायत समिती सभापती सुनीता चौधरी, उपसभापती सुवर्णा साळुंखे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली तायडे, वनिता गवळे, सरपंच सुनीता मानकर, उपसरपंच पुंडलिक कपले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा रंजना कांडेलकर, राष्ट्रवादी प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, माजी सभापती दशरथ कांडेलकर, कदिर शहा फकिर, साहेब खा पठाण, सय्यद गणी, महम्मद शहा, लुकमान मिजवान, सईद मिस्त्री, इमाम शहा, सैफुला खा ठेकेदार, सय्यद भिकन बाबा आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com