Latur Politics News Sarkarnama
मराठवाडा

Latur Mahayuti Melava : त्यावेळी ठाकरे घरात बसून; अजित पवारांच्या शिलेदाराने साधला निशाणा

Sanjay Bansode Criticized Uddhav Thackeray : महायुतीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे टार्गेट...

राम काळगे

Marathwada Political News :

राज्यभरासह मराठवाड्यात एकाच दिवशी अनेक जिल्ह्यात आज महायुतीचे संयुक्त मेळावे होत आहेत. या मेळाव्यातून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविजयाचा संकल्प करण्यात येत आहे. लातूर येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात सगळ्याच नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याचे दिसून आले. कोरोना काळात उद्धव ठाकरे घरात बसून होते, तेव्हा Ajit Pawar रात्रंदिवस काम करत होते, असे सांगत राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

एक रोखठोक नेता म्हणून अजित पवारांची महाराष्ट्राला ओळख आहे. मी त्या वेळीही मंत्री होतो आताही मंत्री आहे. मात्र विकासकामासाठी झपाटलेला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब काम करत असल्याचेही बनसोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले. मराठवाड्यातील आठही लोकसभेच्या जागा महायुती जिंकणार असून महाराष्ट्रात मराठावाडा एक नंबरला असेल हे दाखवून देऊ, असा दावाही मंत्री बनसोडे यांनी यावेळी केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करू, अशी ग्वाही बनसोडे यांनी उपस्थितांच्या साक्षीने दिली.

व्यासपीठावरील महायुतीचे ऐक्य पाहिल्यानंतर काँग्रेस अथवा इंडीया आघाडी शिल्लक राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. महायुतीच्या मेळाव्यात पहिल्यादांच खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, अभिमन्यू पवार, माजी खासदार गोपाळराव पाटील, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, भाजप युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, गोविंद केंद्रे, बब्रुवान खंदाडे, माजी खासदार सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख आदी पदाधिकारी एकत्र आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वांचे लक्ष्य एकच ते म्हणजे 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असल्याचे सांगितले. अनेक धाडसी निर्णय नरेंद्र मोदींनी घेतले आहेत. जुलमी कायदे रद्द केले, राम मंदिराचा प्रश्न निकाली काढला, 33 टक्के स्रीयांना आरक्षण देण्याचे काम केले. गरजूनां घर, गावागावत शौचालय, उज्ज्वला गॅस सारख्या योजनांमुळे गरीबांचे जीवन सुसह्य बनवले. देशाची मान जगामध्ये उंचावण्याचे काम मोदींनी केले, असे विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे म्हणाले.

मोदींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसकडे काय प्लॅन आहे. ज्या काँग्रेसने सत्तेच्या काळात घरे भरण्याचे काम केले. त्यांनी नरेंद्र मोदींवर बोलू नये, अशी टीका खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी केली.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT