Abdul Sattar News : एकापाठोपाठ संकटांचा फेरा सुरुच; मंत्री सत्तार हनुमानाच्या दारात...

Chhatrapati Sambhajinagar Politics: सत्तार आणि कराड हे प्रचारानिमित्ताने एकत्र आले होते.
Abdul Sattar - Bhagwat Karad
Abdul Sattar - Bhagwat Karad Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे कायम चर्चेत राहणारे व्यक्तिमत्व. मग ती चर्चा चांगल्या अर्थाने असो की वादामधून झालेली असो. सत्तारांवर कायम माध्यमांचा फोकस असतो. गेल्या आठवड्यात वाढदिवसानिमित्त मतदारसंघात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलिसांना मागच्या बाजूला बसलेल्यांना सोलून काढा, त्यांची हड्डी तुटली पाहिजे, असे आदेश दिल्यामुळे सत्तारांवर चोहोबाजूंनी टीका झाली होती.

त्याच अब्दुल सत्तारांनी शनिवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्यासह खुलताबाद येथील भद्रा मारोतीचे दर्शन घेतले. निमित्त होते छत्रपती संभाजीनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक. या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ खुलताबाद येथे करण्यात आला. जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या सर्वांगीण विकास करण्याकरिता "मजूर सहकारी विकास पॅनल" च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कराड आणि सत्तार या दोन्ही नेत्यांनी केले.

Abdul Sattar - Bhagwat Karad
Mahadeo Jankar-Bhujbal: '...अन् भाषणाआधी महादेव जानकरांनी स्टेजवरच भुजबळांचे पाय धरले!'

सत्तार आणि कराड हे आज या प्रचारानिमित्ताने एकत्र आले होते. खुलताबाद मध्येच असल्यामुळे आणि योगायोगाने शनिवारी(ता.13) असल्यामुळे कराड यांनी भद्रा मारोतीचे दर्शन घेतले. मराठवाड्यातील जनतेच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी लाभू दे असे साकडेही कराड यांनी मारोतीला घातले. यावेळी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हेही त्यांच्यासोबत होते. गेल्या काही दिवसापासून सत्तार हे कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वादात सापडत आहेत.

वाढदिवसानिमित्त आयोजित सिल्लोड महोत्सवात गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) लावणीवेळी मोठा गोंधळ उडाला. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी सत्तारांनी पोलिसांना त्यांच्यावर लाठ्या चालवण्याचे आदेश दिले. हे आदेश देतांना अक्षरशः शिव्या दिल्या, आर्वाच्य भाषा वापरली. सत्तारांच्या आदेशामुळे पोलिसांनीही अनेकांना लाठ्यांचा प्रसाद दिला. समाज माध्यमांवर हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वादावर खेद व्यक्त करत पडदा टाकत नाही, तोच हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या आॅनलाइन बैठकीत आपल्याच पक्षाच्या खासदारासोबतच्या प्रेमळ संवादाची आॅडिओ व्हायरल झाली. यातही सत्तार आपल्या स्टाईलमध्ये खासदार हेमंत पाटील यांच्याशी बोलत होते.

दोघांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहिली, भ्रष्टाचार आणि टक्केवारीचे आरोप केले. हा प्रकारही चांगलाच गाजला. सत्तारांच्या मागे जणू शनिची साडेसातीच लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कदाचित ही शनिची साडेसाती निघावी, यासाठी सत्तारांनीही भद्रा मारोतीला साकडे घातले की काय? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला असावा.

Abdul Sattar - Bhagwat Karad
MP Sujay Vikhe : खासदार विखेंनी थोरात,ठाकरे, कोल्हे, आव्हाड अन् पवारांचं सगळंच काढलं...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com