Majalgaon ACB Raid ACB officials conducted a raid at the Assistant Registrar's office in Majalgaon, where three individuals were allegedly caught accepting a bribe during a trap operation.
मराठवाडा

ACB Raid: 'परवाना हवा तर लाच द्या'; बीडमध्ये सहाय्यक निबंधकासह तिघे एसीबीच्या रंगेहाथ जाळ्यात

Majalgaon ACB Raid, Bribery Case, Assistant Registrar: माजलगाव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात एसीबीने छापा टाकून सहाय्यक निबंधकासह तिघांना खाजगी सावकारकी परवान्यासाठी कथित १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

Jagdish Pansare

Majalgaon ACB Raid: माजलगांव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात मंगळवारी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने धाड टाकून सहाय्यक निबंधकासह तिघांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. खाजगी सावकारकीचा परवाना मंजूर करून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी तेरा हजार रुपये स्वीकारताना माजलगांव येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात लाचलूचपत विभागाच्या पथकाने छापा मारला. सहाय्यक निबंधकासह तिघांना या पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर तडजोडीअंती तेरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक निबंधक सुरज जगदाळे, कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने, खाजगी इसम महेश फपाळ या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

कारवाईनंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एसीबीच्या पथकाने कार्यालयात बराच वेळ ठाण मांडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली. संबंधित कागदपत्रे, नोंदी आणि इतर पुरावे ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या घटनेमुळे महसूल व सहकार विभागातील कामकाजाबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शकपणे होण्याची अपेक्षा असताना लाचेच्या मागणीसारख्या घटना समोर येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या कारवायांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लाचेची देवाण - घेवाण सुरूच

शहरासह तालुका परिसरात शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे कुठलेही काम करायचे म्हटलं की, पैशांची मागणी करतात. त्यामुळे लाचेची देवाण - घेवाण सुरूच असते. कामापोटी सर्वसामान्य नागरिकांना पैसे दिल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे लाच प्रकरणात कारवाया सुरू असतांना देखील अशा घटनांची पुनरावृत्ती नेहमीच होते. परंतु लाचखोरीचे प्रमाण काही कमी होतांना दिसत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT