Kolhapur: कोल्हापूरमध्ये तब्बल 243 एकर जमिनीचा घोळ : पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Gaganbawda Land Scam, Kolhapur Land Fraud, Land Records: गगनबावडा येथील २४३ एकर जमीन प्रकरणात बनावट कागदपत्रांद्वारे पोटहिस्सा व सातबारा फेरफार उघडकीस आल्यानंतर आदेश रद्द करण्यात आले असून संबंधितांवर फौजदारी कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
Officials cancelled disputed land records in the Gaganbawda 243-acre land case after alleged document forgery, with criminal action ordered against those responsible.
Officials cancelled disputed land records in the Gaganbawda 243-acre land case after alleged document forgery, with criminal action ordered against those responsible.Sarkarnama
Published on
Updated on

Gaganbawda Land Scam: गगनबावडा येथील गट नंबर १४ मधील रद्द झालेले वटमुखत्यारपत्र जोडून जवळपास २४३ एकर जमिनीचा पोटहिस्सा व कजापमध्ये केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांनी पोटहिस्सा व कजाप (कमी-जास्त पत्रक) आदेश रद्द केला आहे. संबंधित व्यक्ती कौस्तुभ हेमंत आराध्येवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे आदेश देऊनही गगनबावडा उपअधीक्षक भूमी अभिलेख संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. इतकेच नाहीतर यासंदर्भात दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी पालकमंत्री व खासदारांनी सूचना देऊनही त्यांचे आदेश ही न जुमानल्याचे चित्र आहे.

मौजे गगनबावडा ता. गगनबावडा जि. कोल्हापूर येथील गट नं. १४ ची नियमीत पोटहिस्सा मो.र.नं. ०२६५६०, १८ डिसेंबर २०२४ नूसार ११ मार्च २०२५ रोजी केली मोजणी व त्याअनुषंगाने तयार झालेला मोजणी नकाशा तसेच क.जा.प.नं. ७/२०२५ मंजुर १५ मार्च २०२५ रद्द करणेत येऊन मोजणी पुर्वीची स्थिती कायम करणेत येत आहे. असे आदेश जिल्हाअधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांनी दिले आहेत. जबाबदारांनी आवश्यक तर सर्व कायदेशीर कागदपत्रांची पुर्तता करुन पोटहिस्सा मोजणीकामी नव्याने अर्ज करुन पोटहिस्सा मोजणी करुन घ्यावी असेही आदेश दिले आहेत.

Officials cancelled disputed land records in the Gaganbawda 243-acre land case after alleged document forgery, with criminal action ordered against those responsible.
Maharashtra Live Update : घुले हत्या प्रकरणात एसआयटीला सहकार्य करणार - बजरंग सोनवणे

मौजे गगनबावडा येथील गट नंबर १४ मध्ये जमीन व्यवहार प्रकरणात रद्द झालेले वटमुखत्यारपत्र जोडून सातबारा मध्ये फेरफार करण्याचा प्रकार घडला होता. तसेच पोटहिस्सा व कजापकरण्याचा प्रयत्न केला होता. जवळपास या गट नंबर मध्ये २४३ एकर जमीन आहे. जुन्या वटमुखत्यारपत्रामधील काही व्यक्ती मयत झाले असताना देखील त्यांना जीवित दाखवून सातबाऱ्यांची फोड करण्यात आली होती. त्या संदर्भात विभागीय अधिकारी करवीर यांच्याकडे तक्रारदार योगिता कृष्णात खुटाळे, प्रीतम विष्णू सुतार यांनी तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नव्याने तयार करण्यात आलेले सातबारे आणि कजाप आदेश जिल्हाअधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांनी रद्द केले होते. दरम्यान, कागदपत्रांमध्ये फेरफार करून सातबारा मध्ये फोड करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे आदेश देखील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख गगनबावडा यांना दिले आहेत.

संबंधित पाटील नामक व्यक्तीकडून मज्जाव

धक्कादायक बाब म्हणजे या जमीन व्यवहारातील प्रमुख असणाऱ्या पाटील नामक व्यक्तीने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गायरान जमिनीवर देखील अतिक्रमण केले आहे. गगनबावडा येथील गायरान गट नंबर ६ मध्ये अतिक्रमण करून अलीकडेच रस्ता अडवलेला आहे. इतकेच नव्हे तर कायदेशीर समज देणारा फलक देखील या ठिकाणी लावला आहे. सदरच्या जमीनीचा आदेश रद्द होऊन देखील गेल्या चार महिन्यांपासून हे लोखंडी पोल या ठिकाणी तसेच आहेत. त्यामुळे यावर कारवाई कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Officials cancelled disputed land records in the Gaganbawda 243-acre land case after alleged document forgery, with criminal action ordered against those responsible.
PMC: पुणे महापालिकेचे बनावट लेटरहेड, IT चे बोगस सर्टिफिकेट; पुण्यात बेरोजगार तरुणांची लाखोंची फसवणूक, गृहविभागाची 'सुमोटो' चौकशी

अर्थपूर्ण घडामोडी?

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तक्रारदार प्रशासनाकडे या संदर्भात दाद मागत आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तक्रारदारांचीच ससेहोलपट होतं असल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांनी आदेश देऊन देखील स्थानिक अधिकारी तक्रारदारांची दखल घेत नसल्याने यामध्ये अर्थपूर्ण घडामोडी घडत आहेत की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

लवकरच तक्रार दाखल करू

जिल्हा भूमीलेख अधीक्षक शिवाजी भोसले यांनी हा कब्जापट्टी आणि फोड केलेले सातबारे यांची चौकशी करून ते रद्द केले आहेत. ज्यांनी यामध्ये बेकायदेशीर काम केले आहे. त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल अशी प्रतिक्रिया उपभूमी अधीक्षक गगनबावडा वावरे यांनी सरकारनामाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com