Majalgaon Assembly Sarkarnama
मराठवाडा

Majalgaon Assembly Election : आमदार सोळंके यांच्याकडेच माजलगावच्या विकासाची दृष्टी -डाॅ. प्रकाश आनंदगावकर

Majalgaon Assembly Election : येत्या चार महिन्यांच्या काळामध्ये आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न, नाट्यगृह अशा विविध शहरवासीयांच्या समस्या सोडविणार

सरकारनामा ब्यूरो

Majalgaon Assembly Election : माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मागील ३५ वर्षांपासून आमदार प्रकाश सोळंके यांनी विकासाच्या विविध महत्वाकांक्षी योजना राबविल्या असून विकासाभिमुख नेतृत्व असणाऱ्या महायुतीचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना मतदारांनी पाचव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी संधी द्यावी, असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रकाश आनंदगांवकर यांनी केले.

महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थ शहरामध्ये आयोजित कॉर्नर बैठकीमध्ये ते बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. आनंदगांवकर की, माजलगाव विधानसभा मतदारसंघातील माजलगाव, वडवणी, धारूर या तीनही तालुक्यात आमदार सोळंके यांनी विविध विकासकामे केली आहेत.

त्याचबरोबर शहरातील विविध प्रभागातील रस्ते, पाणी, वीज आदी प्रश्नांची देखील प्राधान्यक्रमाने सोडवणूक केली आहे. विकासाची दुरदृष्टी असलेला नेता म्हणून माजलगाव मतदारसंघात आमदार प्रकाश सोळंके यांची ओळख आहे.

मतदारसंघात सिंचनप्रकल्प, एमआयडीसीसह अनेक विकासाचे प्रकल्प राबविले आहेत. त्यामुळे माजलगावला नव्या शिखरावर नेणारा नेता म्हणूनही सोळंके यांचेकडे पाहिले जाते. येत्या चार महिन्यांच्या काळामध्ये आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न, नाट्यगृह अशा विविध शहरवासीयांच्या समस्या सोडविण्याचे स्मार्ट अभिवचन आमदार सोळंके यांनी दिले आहे.

त्यामुळे विकासाचा दृष्टिकोन त्यांच्याकडेच आहे, असेही डॉ. प्रकाश आनंदगांवकर यांनी सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरूण राउत, शिवसेना तालुकाप्रमुख तुकाराम येवले, नासेर पठाण, अच्युत लाटे, हनुमान कदम, खलील पटेल, सभापती जयदत्त नरवडे, संभाजी शेजुळ, चंद्रकांत शेजुळ, शिवाजी रांजवण, धनंजय सोळंके, अभिजीत कोंबडे यांचेसह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT