Harshwardhan Sapkal, Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : 'शिवाजी महाराजांची बरोबरी...'; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Malegaon Tipu Sultan Controversy : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे.

Jagdish Patil

Malegaon Tipu Sultan Controversy : मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान फोटो लावल्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं होतं. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केल्यानंतर अखेर हा फोटो हटवण्यात आला.

मात्र, फोटो काढल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान संदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे.

सपकाळ यांच्या याच वक्तव्यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "शिवाजी महाराजांची बरोबरी कोणाशीच होणार नाही आणि होऊ शकत नाही.", असं जरांगी यांनी म्हटलं आहे. ते कर्जतमध्ये बोलत होते. यावेळी जरांगे पाटलांनी मराठवाड्यात तब्बल ५८ लाख नोंदी सापडल्या असून हळूहळू मराठवाड्यातील प्रत्येक मराठ्याला ओबीसी दाखला मिळणार, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पत्रकारांनी जरांगे यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची बरोबरी शिवाजी महाराजांसोबत केल्या संदर्भात प्रश्न विचारला असता मनोज जरांगे पाटील म्हणाले, "शिवाजी महाराजांची बरोबरी कोणाशी होणार नाही आणि होऊ शकत नाही. त्यांच्यावर कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. पण ते तसं बोलले असतील तर केवळ त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठीच नेतेमंडळी असं बोलतात."

हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

हर्षवर्धन सपकाळ टिपू सुलतान बाबत बोलताना म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि त्यांनी स्वराज्य नावाचा एक विचार ज्या पद्धतीने दिला आहे, अगदी त्यांच्याच मांदियाळीमध्ये, त्यांच्यानंतर त्यांचा बराच कालावधी लोटल्यानंतर, त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता.

आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केलं नाही. तर एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT