Manoj Jarange Maratha Reservation :  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Indefinite Hunger Strike : 'मामा, एक घोट तरी पाणी प्या प्लिज'; रडवेल्या मुलीची जरांगेंना साद

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत

अनुराधा धावडे

Jalna Political News : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. जरांगेंनी गेल्या सहा दिवसांपासून काहीही खाल्ले नाही, की पाणीही प्यायले नाहीत. त्यामुळे आज त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. एकीकडे राज्यात मराठा समाज आक्रमक झाला असताना दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये जरांगेच्या उपोषणाच्या ठिकाणी हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहायला मिळाला.

राज्यभरातून जमलेल्या आंदोलकांनी जरांगेंना पाणी पिण्यासाठी आग्रह धरला. आज तुम्ही पाणी प्यायलाच पाहिजे, समाजाला तुमची गरज आहे. अशा शब्दांत लोकांनी जरांगेंना आवाहन केले. पण दुसरीकडे एक मुलगी अक्षरश: जरांगे मामा एक घोट पाणी प्या, प्लिज, अशी साद घालताना दिसत होती. आपण आरक्षण घेऊ, पण तुम्ही आधी पाणी प्या, आई भवानीची शपथ आहे तुम्हाला, अशीही तिने साद घातली.

तिथे उपस्थित माध्यम प्रतिनीधीनी तिला तु कुठून आलीस असे विचारले असता आपण नांदेडहून रात्री नऊ वाजता आल्याचे सांगितले. तिची आई आणि बहिणही तिच्यासोबत आल्याचे तिने सांगितले. व्यासपिठाच्या समोर उभी राहून बराच वेळी ती जरांगेंना साद घालत होती. जरांगेंना साद घालताना तिचे डोळे पाणावले होते. जरांगेंना साद घालताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मला दोन मिनिटांसाठी वर जाऊ द्या, त्यांना पाणी पिऊ द्या,अशाही भावना तिने व्यक्त केल्या.

आज सकाळी जरांगेच्या बहिणही आंदोलनाच्या ठिकाणी आली होती. माझ्या भावाची ट्रिटमेंट करा, त्याची काळजी घ्या, आरक्षण मिळेल पण आधी माझ्या भावाची ट्रिटमेंट करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काहीही झाले तरी मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही, मराठ्यांच्या मुलांना खूप त्रास झाला आहे. त्यांच्यावर अन्याय झालाय आहे. मला माझ्या समाजासाठी लढायचे आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच, खानदानी मराठा कधी झुकत नाही, मराठा, क्षत्रिय लढून मरतो, आत्महत्या करून नाही, असही त्यांनी यावेळी नमुद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT