Yavatmal Maratha News : यवतमाळला निघालेल्या आमदाराला संतप्त मराठा बांधवांनी पाठवले घरी; म्हणाले, आतापर्यंत झोपले होते का?

MLA Namdev Sasane : दुपारी दीड वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नव्हते.
Namdev Sasane and Maratha activists
Namdev Sasane and Maratha activistsSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District Maratha Political News : यवतमाळ येथे आज (ता. ३०) ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नामदेव ससाणे त्यांच्या कारने निघाले होते. दरम्यान, संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एका गावात त्यांची वाट अडविली. (Could not reach the venue till half past noon.)

आतापर्यंत झोपले होते का, असा संतप्त सवाल उपस्थित करत खडे बोल सुनावले. एवढेच नव्हे तर यवतमाळकडे जाऊ न देता, त्यांना घराकडे परत पाठविले. त्यामुळे दुपारी दीड वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज यवतमाळ येथील आर्णी मार्गावरील किन्ही येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमाला नागरिकांची भरगच्च उपस्थिती राहावी, यासाठी सत्ता पक्षांतील जिल्ह्यातील आमदार आणि लोकप्रतिनिधींना सांगण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून आमदार नामदेव ससाणे मतदारसंघातील काही गावांमध्ये नागरिकांना कार्यक्रमाला चलण्यासाठी काल (ता. २९) आवाहन करायला गेले. मात्र, काही गावांमध्ये मराठा समाजाच्या नागरिकांनी त्यांना वेशीवरच अडविले.

दरम्यान, आज सकाळी ते स्वतः यवतमाळला कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले. तेव्हा उमरखेड तालुक्यातून यवतमाळकडे जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी मराठा समाज बांधव असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे संतप्त मराठे वाट अडवतील, शिवाय त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, हा धोका त्यांच्या लक्षात आला. परिणामी ससाणे हे महागाव तालुक्यातील वरोडी फाटा मार्गे यवतमाळकडे जाण्यासाठी निघाले. याची कुणकुण लागताच वरोडी फाटा परिसरात संतप्त मराठ्यांनी त्यांचे वाहन अडविले.

ससाणे हे वाहनाबाहेर आले. या वेळी त्यांनी कार्यक्रमाला जाणे, गरजेचे आहे. तिथे मुख्यमंत्री शिंदे यांच्यापुढे मतदारसंघातील समस्या मांडायच्या आहेत, अशी आर्जव घातली. तेव्हा संतप्त मराठ्यांनी ससाणे यांना खडे बोल सुनावले. एवढेच नव्हे तर ‘आतापर्यंत झोपले होते का’, असा सवाल उपस्थित करीत रोष व्यक्त केला. तेव्हा ससाणे यांनी वाद टाळण्यासाठी उमरखेडकडे परतीचा मार्ग पत्करला.

व्हिडिओ तुफान व्हायरल...

वरोडी फाटा परिसरात आमदार ससाणे यांची संतप्त मराठा बांधवांनी वाट अडविली. त्यानंतर त्यांना खडे बोल सुनावत रोष व्यक्त केला. या वेळी काही नागरिकांनी या घटनाक्रमाचे मोबाईलद्वारे चित्रीकरण केले. ते व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाले. आमदार ससाणे यांची चांगलीच गोची झाली. यावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले.

Edited By : Atul Mehere

Namdev Sasane and Maratha activists
Punvat Yavatmal News : पतीचा हस्तक्षेप सरपंच महिलेला पडला महागात; सीसीटीव्हीने फोडले बिंग अन् झाली अपात्र !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com