Manisha Kayande News Sarkarnama
मराठवाडा

Manisha Kayande News : मराठी बांधवांना आरोग्य सुविधा पुरवण्यास विरोध ; कर्नाटकचा मस्तवालपणा उतरवा..

Shivsena : दिल्लीश्वरांचे गुणगान गाणारे शिंदे सरकार धाडस दाखवून हे आव्हान स्वीकारणार काय?

सरकारनामा ब्युरो

Vidhan Parisad : महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च-2023 च्या भाषणात राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत भरघोस वाढ केली आहे. (Manisha Kayande) कर्नाटक सरकारच्या ताब्यात असलेल्या सीमाबांधवांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारने 54 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. मात्र कर्नाटकातील राज्यकर्त्यांची मस्ती शिखरावर पोहोचली असून महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला निधी रोखण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली.

याचे पडसाद विधान परिषदेत आज उमटले. सभागृहात आमदार डॉ.मनीषा कायंदे यांनी "पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन" च्या माध्यमातून कर्नाटक सरकारचा मस्तवालपणा उतरवून सीमावर्ती भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करत सभागृहाचे लक्ष वेधले. (Maharashtra)महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील एकूण 865 गावांमध्ये ही योजना राबवली जाणारा असून कानडी मुख्यमंत्री व तेथील विरोधीपक्ष नेते यांनी याबाबत कर्नाटक (Karnataka) विधानसभेच्या अधिवेशनात आक्षेप घेतला.

मात्र यावर महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत कोणतीही ठोस भूमिका जाहीर केली नसून सरकार चिडीचूप बसले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील भाजपच्या दोन पुढाऱ्यांमध्ये हा वाद असून यामध्ये सीमावर्ती भागातील बांधव भरडला जात असल्याने कर्नाटक सरकारचे हे आव्हान स्वीकारून सीमा बांधवांपर्यंत आवश्यक निधी पोहोचवत राज्य सरकारने दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही डॉ. कायंदे यांनी यावेळी केली.

दिल्लीश्वरांचे गुणगान गाणारे शिंदे सरकार धाडस दाखवून हे आव्हान स्वीकारणार काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावर सरकारच्या वतीने वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदन केले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना किंवा तेथील इतर नेत्यांना सीमावर्ती भागातील मराठी बांधवांना पुरवल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा रोखण्याचा कोणाताही घटनात्मक अधिकार नाही. त्यामुळे राज्य सरकार सीमावर्ती भागातील मराठा बांधवांना महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सुविधा पुरवणार, यात कुठलीही कायदेशीर अडचण नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT