Khaire On Ramdas Kadam : तुम्ही खोके कुठून आणले ; बंगले, हाॅटेल, गाड्या कोणत्या पैशातून झाल्या..

Beed : ईडी, सीबीआय तुमच्या मागे लागेल तेव्हाच तुम्हाला शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची किंमत कळेल.
Ramdas Kadam-Chandrakant khaire News
Ramdas Kadam-Chandrakant khaire NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : रामदास कदम हे कांदिवली शाखेचे साधे शाखाप्रमुख होते, आज तुमच्याकडे बंगले-टंगले, कारखाने, महागड्या गाड्या कुठून आल्या. (Shivsena) शिवसेनेला तुम्ही नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्या सारख्याला मोठं केलं. खोक्याची भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही, मातोश्रीवर द्यायला खोके तुम्ही कुठून आणले? असा सवाल ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी माजी मंत्री रामदास कदम यांना केला.

Ramdas Kadam-Chandrakant khaire News
Sushma Andhare News : अर्धे तिकीट नको, अकराशेचा गॅस चारशे रुपयात द्या..

खेड येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत मी मातोश्रीवर मिठाईचे खोके दिले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही देखील देत होतात, योगेश मिठाईचे खोके घेवून जायचा, असा आरोप रामदास कदम यांनी केला होता. यावर बीड दौऱ्यावर असलेल्या चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी खोके कुठून आणले? असा सवाल करत टीका केली.

खैरे म्हणाले, मातोश्रीवर मिठाईचे खोके दिल्याचे रामदास कदम सांगतात. माझा त्यांना प्रश्न आहे, तुमच्याकडे खोके कुठून आले? तुम्ही ते कसे कमावले आहे हे मला चांगले माहित आहे. पर्यावरण मंत्री असतांना कंपन्यांना प्रदूषण करत असल्याबद्दल नोटीसा पाठवायच्या आणि मग त्यांचे लोक येवून तुम्हाला खोके द्यायचे. आमच्या छत्रपती संभाजीनगरात तुम्ही हेच केले, याच्या अनेक तक्रारी तेव्हा उद्योजक करायचे.

त्यामुळे तुम्ही खोक्यावर बोलणे म्हणजे हास्यास्पदच आहे. शिवसेनेत बाळासाहेबांनी सगळ्यांना मोठं केलं. तुम्ही साधे शाखाप्रमुख होतात, तुम्हाला साहेबांनी आमदार केलं, उद्धवसाहेबांनी मंत्री केलं. आज तुमचे बंगले-टंगले, हाॅटेल, कंपन्या, महागड्या गाड्या या कुठून आल्या? आता गद्दारी करून तुम्ही सरकारमध्ये आहात, पण उद्या जेव्हा तुमचे सरकार कोसळेल आणि ईडी, सीबीआय तुमच्या मागे लागेल तेव्हाच तुम्हाला शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची किंमत कळेल. शिवसेनेला तुम्ही नाही, तर आमच्या मराठवाड्याने भक्कम साथ दिली, असा टोला देखील खैरे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com