Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ आॅगस्ट रोजी अंतरवाली सराटीत उपोषण सुरू झाले. तिसऱ्या दिवशी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी जरांगे यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आलेल्या पोलिसांनी विरोध होताच आंदोलकांवर लाठीमार केला. (Manoj Jarange Rally) अश्रुधुराच्या नळकांड्या, गोळीबार आणि त्यात दोन्ही बाजूची लोकं गंभीर झाली. पोलिसांनी केलेल्या या बळाच्या वापरामुळेच अंतरवालीत सुरू असलेले आंदोलन राज्यभरात गेले आणि त्याचा वणवा पेटला.
तेव्हापासून मराठा समाजाचा पोलिसांवर राग आहे. राज्य सरकारने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी घटनास्थळी दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत. (Maratha Reservation) या पार्श्वभूमीवर अंतरवालीत आज होणाऱ्या सभेसाठी चौदाशे पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. (Jalna) वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कर्मचारी, महिला यांच्यावर सभेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
लाखोंच्या संख्येने उपस्थित मराठा समाज बांधवांमध्ये तरुणांची मोठी संख्या होती. तरुणांकडून पोलिसांबद्दल असलेला राग कुठल्याही परिस्थितीत व्यक्त होऊ नये, सभेला गालबोट लागू नये, याची काळजी स्वतः जरांगे पाटील घेताना दिसले. (Marathwada) सभेत येणाऱ्या प्रत्येकाला शांततेचे आवाहन करतानाच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन जरांगे वारंवार करत होते. पोलिसांनी आपल्याला सहकार्य केले आहे, ते आपल्याला मदत करत आहेत. त्यांनाही सहकार्य करा, मदत करा, कुठेही शांतता बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशी विनंती जरांगे वारंवार करत होते.
सभेला मोठ्या संख्येने महिला, वृद्ध, लहान मुलं आलेली होती. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी जशी पोलिसांची होती, तशीच ती जरांगे आणि ज्या १२३ गावांतील लोकांनी आजची सभा आयोजित केली, त्यांचीदेखील होती. याची जाणीव सभेसाठी नियुक्त केलेल्या दहा हजार स्वयंसेवक आणि आयोजकांनाही होती. त्यामुळेच जरांगे यांनी आपल्या भाषणात पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना संबंधितांना केली.
सभा संपल्यानंतर मैदानात कचरा राहणार नाही, याचीही काळजी घ्या, असे आवाहन जरांगे करत होते. अंतरवालीत पोलिसांकडून झालेला बळाचा वापर आणि त्यात जखमी झालेल्या आंदोलक, महिला याबद्दल समाजामध्ये संताप आहे. लाखोंच्या संख्येने तरुण जमा झाल्यावर याचा कुठे उद्रेक होऊ नये, या भावनेतून जरांगे यांनी पोलिसांना मदत आणि सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या या समयसूचकतेचे कौतुक होत आहे. सभा शांततेत पार पडली, कुठेही गोंधळ, गडबड किंवा गैरप्रकार झाला नाही. याचे श्रेय अर्थातच शांत आणि संयमी मराठा समाज, जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाते.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.