Manoj jarange Rally News : `आरक्षण दिल्याशिवाय घराचा उंबरा शिवणार नाही` जरांगेच्या प्रामाणिकपणावर मराठा फिदा...

Jalna News : आंदोलनाच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांपैकी हा मराठा नाही, याची पावतीच लाखोंच्या गर्दीने जरांगे यांना दिली.
manoj jarange rally in antarwali sarati
manoj jarange rally in antarwali saratiSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेने गर्दीचे मराठवाड्यातील सगळे रेकाॅर्ड आज मोडले. (Manoj jarange Rally News) लाखोच्या संख्येने रखरखत्या उन्हात बसलेल्या समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी घराचा उंबरा शिवणार नाही, असा शब्द जरांगे यांनी आपल्या भाषणात दिला.

manoj jarange rally in antarwali sarati
Manoj Jarange Family : मनोज जरांगेंच्या पाठीशी आईचा आशीर्वाद, सभेला उपस्थित...

चाळीस मिनिटांच्या भाषणात जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढू. (Maratha Reservation) एकतर माझी अंतयात्रा निघेल, नाहीतर मराठा आरक्षणाच्या विजयाची जल्लोष यात्रा, असा विश्वासही जरांगे यांनी उपस्थितीत जनसमुदायाला दिला.

जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सुरू केलेल्या उपोषणाला सतराव्या दिवशी यश मिळाले होते. (Jalna) ज्या राज्य सरकारने जरांगे यांचे आंदोलन पोलिस बळाचा वापर करत दडपण्याचा प्रयत्न केला तेच सरकार झुकले आणि महिनाभराची मुदत माघून घेत माघारी फिरले. (Marathwada) एकदा आंदोलन गुंडाळले की ते पुन्हा उभे राहणार नाही, असा सरकारचा समज होता, पण जरांगे यांनी तो खोटा ठरवला.

सरकारला दिलेली मुदत संपण्याआधाची जरांगे यांनी राज्याच्या विविध भागात फिरून सभा घेतल्या. १४ आॅक्टोबरच्या भव्य सभेची पार्श्वभूमी तयार केली आणि अंतरवाली सराटीत आज इतिहास घडला. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मनोज जरांगे यांनी दिलेल्या हाकेला समाजाने अशी काही साथ दिली की सभेच्या ठिकाणी नजर जाईल तिथे लोक, भगवे झेंडे आणि वाहनांची गर्दीच दिसत होती. जरांगे यांच्यावर समाजाने विश्वास दाखवला कारण त्यांचा शुद्ध हेतू आणि प्रामाणिकपणा भावला.

आंदोलनाच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांपैकी हा मराठा नाही, याची पावतीच राज्यभरातील दौऱ्यात आणि आज अंतरवाली सराटीतील सभेत लाखोंच्या गर्दीने जरांगे यांना दिली. आता जरांगे यांनीही मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळवून दिल्याशिवाय घराचा उंबरा शिवणार नाही, असा शब्द देत पुन्हा एकदा मनं जिंकली.

manoj jarange rally in antarwali sarati
Maratha Reservation News : मनोज जरांगे पाटील तर सरकारवर तुटूनच पडले, म्हणाले...

२२ आॅक्टोबर रोजी जरांगे आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. सरकारच्या हाती आणखी दहा दिवस आहेत, आजच्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहिल्यानंतर सत्ताधारी कोणते पाऊल उचलतात, यावर मराठा आरक्षणाचा पुढचा लढा कसा असेल हे स्पष्ट होईल. आजच्या सभेने जरांगे यांना समाजाचा मोठा पाठिंबा असल्याचे दाखवून दिले आहे.

आपल्याला राजकारण करायचे नाही, गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना चांगले शिक्षण आरक्षणाच्या माध्यमातून द्यायचे आहे, असे स्पष्ट करत जरांगे यांनी आपला लढा फक्त आरक्षणासाठीच असल्याचे दाखवून दिले. निःस्वार्थपणे समाजाच्या कामाला वाहून घेतलेल्या जरांगेवर समाजाने आता विश्वास टाकला आहे, जरांगेही त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी झटताना दिसत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com