Manoj Jarange Patil On Dhananjay Munde News sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना रोजगार हमीवर बराशी खोदायला पाठवा; मनोज जरांगे यांचा टोला

Manoj Jarange Patil On Dhananjay Munde : मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.

Jagdish Pansare

  1. “रिकामं ठेवू नका” असे म्हणणाऱ्या धनंजय मुंडेंना मनोज जरांगे पाटलांनी रोखठोक सल्ला दिला.

  2. जरांगे म्हणाले – मुंडेंना रोजगार हमी योजनेच्या कामावर पाठवा.

  3. या विधानामुळे नवा वाद पेटला आहे.

Dhananjay Munde News : चूक झाली असेल तर कान धरा, पण आता रिकामं ठेवू नका, जबाबदारी द्या, असे साकडे आमदार धनंजय मुंडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घातले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील सत्कार सोहळ्यात मुंडे यांनी केलेल्या या भाषणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. यावर विविध प्रतिक्रिया नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यावर काय बोलतात याची उत्सूकता होती. धनंजय मुंडे यांचे हात रिकामे आहेत, त्यांना रोजगार हमीच काम द्या, बराशी खोदायला त्यांना पाठवा, असा खोचक टोला जरांगे पाटील यांनी लगावला. धनंजय मुंडे यांनी मराठ्यांच्या नादाला लागू नये, असा इशारा देतानाच आम्ही मग अजित पवारांनाही सोडणार नाही, असे जरांगे म्हणाले.

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणापासून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणारे आरोपी हे धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने जरांगे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामाही मागितला होता. एकूणच मराठा आरक्षणासाठीचा लढा जेव्हापासून जरांगे पाटील यांनी सुरू केला अगदी तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचे खटके उडाले.

संधी मिळेल तेव्हा मनोज जरांगे पाटील धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत असतात. या उलट मुंडे यांनी जरांगे यांच्यावर बोलणे कायमच टाळले. मंत्रीपद गेल्यापासून धंजय मुंडे ते परत मिळवण्यासाठी धडपडत आहेत. कायम सत्तेत आणि मंत्रीपदाची झुल अंगावर पांघरूण वावरण्याची सवय झालेल्या धनंजय मुंडे यांची चलबिचल सध्या वाढली आहे.

धनंजय मुंडे यांनी कर्जत मधील एक पक्षाच्या सत्कार कार्यक्रमात केलेल्या भाषणात 'चुकलो तर कान धरा, नाही चुकलो तर चालतयं, पण आता रिकाम ठेवू नका, जबाबदारी द्या', अशी मागणी केली होती. आता त्यांच्या या विधानावरूनही त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही आपापल्या प्रतिक्रिया दिल्या.

मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा धनंजय मुंडे यांच्या या मागणीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी धनंजय मुंडे यांना रोजगार हमी योजनेच्या कामावर पाठवण्याचा सल्ला दिला. त्यांना बराशी खोदायला पाठवा, पण मराठ्यांचा नाद करू नका अन्यथा आम्ही अजित पवारांनाही सोडणार नाही, अशा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

FAQs

प्र.1: मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना काय सल्ला दिला?
उ.1: त्यांनी मुंडेंना रोजगार हमी योजनेच्या कामावर पाठवण्याचा सल्ला दिला.

प्र.2: धनंजय मुंडेंनी काय विधान केले होते?
उ.2: त्यांनी “रिकामं ठेवू नका” असे विधान केले होते.

प्र.3: हा वाद कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
उ.3: हा वाद मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित आहे.

प्र.4: जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळे काय प्रतिक्रिया उमटल्या?
उ.4: राज्यभरात नवे राजकीय चर्चांना सुरुवात झाली.

प्र.5: रोजगार हमी योजना म्हणजे काय?
उ.5: ग्रामीण भागातील लोकांना रोजगार देण्यासाठी सरकारची योजना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT