Manoj Jarange Patil : मोहोळ उठलं, मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीवर मधमाशांचा हल्ला!

Beehive Attack On Manoj Jarange Patils Meeting : हैदराबाद गॅझेटवरून मराठा समाजातच वाद असल्याचे चित्र आहे. अनेकांनी जीआरवर टीका केली, तर स्वतः जरांगे पाटील यांनी जीआर एकदम ओक्के असल्याचे सांगितले.
Beehive Attack On Manoj Jarange Patils Meeting In Antarwali Sarti News
Beehive Attack On Manoj Jarange Patils Meeting In Antarwali Sarti NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. अंतरवली सराटीत मराठा आरक्षण समन्वयकांच्या बैठकीदरम्यान अचानक मधमाशांचा हल्ला झाला.

  2. अनेकांना चावा बसला असला तरी मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

  3. या घटनेमुळे बैठकीत काही काळ गोंधळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Maratha Reservation News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारला भाग पाडले. या गॅझेटमधील नोंदीच्या आधारे मराठा समाजातील अनेकांना कुणबी जातीचे प्रमाण पत्र वाटप होत आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची काही मोजक्या मराठा समन्वयकांसोबत अंतरवाली सराटी येथे बैठक सुरू होती. शेतात बैठक सुरू असतानाच झाडावरील एक मोहोळ उठलं आणि मधमाशांनी बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला.

मधमाशांनी हल्ला चढवताच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना अंगावर शाल टाकून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. जरांगे पाटील यांना कुठलीही दुखापत झाली नसली तरी मधमाशांच्या हल्ल्यात काहीजण जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर नव्या ठिकाणी ही बैठक पार पडल्याची माहिती आहे.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात धडक देत बेमुदत उपोषण केले. पाचव्या दिवशी सरकारने जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य करत त्यांचे उपोषण सोडवले. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने मान्य करत त्या संदर्भात जीआर देखील काढला. त्यामुळे हा मराठ्यांचा विजय आहे, या निर्णयाने राज्यातील सगळे मराठा आरक्षणात गेल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला.

Beehive Attack On Manoj Jarange Patils Meeting In Antarwali Sarti News
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याने समर्थक आक्रमक; जाब विचारायला जाताच दोन गटात बाचाबाची, भेंडेगावात तणाव

हैदराबाद गॅझेटवरून मराठा समाजातच वाद असल्याचे चित्र आहे. अनेकांनी जीआरवर टीका केली, तर स्वतः जरांगे पाटील यांनी जीआर एकदम ओक्के असल्याचे सांगितले. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत जीआरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु कोर्टाने ही याचिका फेटाळून लावल्याने मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला. हैदराबाद गॅझेटचा आधार आणि त्यातील नोंदीनूसार मराठा समजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमालाही वेग आला आहे.

Beehive Attack On Manoj Jarange Patils Meeting In Antarwali Sarti News
Maratha Reservation Issue: याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी छगन भुजबळ यांना सुनावले, चुकीची माहिती पसरवू नका.

या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्या शेतातील घरी मराठा समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सुरूवात होत नाही तोच शेतात असलेले मोहोळ उठले आणि त्यावरील मधमाशांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला. मधमाशा कडाडून चावा घेत असल्याने बैठकस्थळी एकच गोंधळ उडाला. अनेकांनी मनोज जरांगे पाटील यांना अंगावर शाल पांघरून सुरक्षित स्थळी नेले. जरांगे यांना कुठलीही इजा झाली नाही.

मात्र बैठकीतील अनेकांचा मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत. आता ही बैठक अंतरवाली गावात घेतली जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर त्या विरोधात ओबीसी समाजाचे मोहोळ राज्यभरात उठल्याचे चित्र आहे. रस्त्यावर आणि न्यायालयात लढाई सुरू असताना प्रत्यक्षात मराठा आरक्षण अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीवरही मधमाशांचा हल्ला झाला आहे.

FAQs

प्र.1. अंतरवली सराटीत काय घडले?
मधमाशांनी मराठा आरक्षण बैठकीत अचानक हल्ला केला.

प्र.2. मनोज जरांगे पाटील यांना काही इजा झाली का?
नाही, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

प्र.3. किती लोक जखमी झाले?
अनेकांना मधमाशांनी चावा घेतला, परंतु गंभीर इजा झाल्याचे वृत्त नाही.

प्र.4. बैठक का थांबवावी लागली?
मधमाशांच्या हल्ल्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याने बैठक थांबवली गेली.

प्र.5. या घटनेचा आंदोलनावर परिणाम होईल का?
तात्पुरता गोंधळ झाला, पण आंदोलनाची दिशा कायम राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com