Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Rally : शांतता रॅलीत पहिलाच वार छगन भुजबळांवर; मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

Hingoli Maratha Reservation Shantata Rally : आता एक मंत्री मला म्हणाले पाडा शब्द वापरू नका. आमच्या काळजात धस्कन होतेय.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीनंतर सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिलेली आहे. आता ती जवळ आली असतानाच जरांगेंनी राज्यभर शांतता रॅली काढली आहे. या शांतता रॅलीची सुरूवात शनिवारी (ता. 6) मराठवाड्यातून करण्यात आली.

या रॅलीतील जरांगेंची पहिली मोठी जाहीर सभा हिंगोलीत पार पडली. त्यावेळी त्यांनी पहिलाच वार ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळांवर केला. तसेच राज्य सरकारलाही विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा इशारा दिला आहे.

जरांगे Manoj Jarange म्हणाले, मराठा आरक्षणाला विरोध करू नका. सरकारने फक्त छगन भुजबळ यांचे ऐकून मराठ्यांना विरोध करू नये. तसे होत असेल तर याद राखा. राज्यातील विधानसभेच्या 288 पैकी एकही जागा सरकारची निवडून येऊ देणार नाही. सरकारने शहाणपणाची भूमिका घेऊन आरक्षण द्यावे. भुजबळांचे ऐकून विरोध कराल तर लोकसभा निवडणुकीत झाले पुन्हा तसेच विधानसभेत होईल.

मराठ्यांचा एकच उद्देश आम्हाला फक्त आरक्षण पाहिजेत. राजकारणात काय सुरू आहे त्याचे आम्हाला काही देणेघेणे नाही. आता एक मंत्री मला म्हणाले पाडा शब्द वापरू नका. आमच्या काळजात धस्कन होतेय. त्यांनी लक्षात ठेवावे की मराठा आणि कुणबी ऐकच आहेत. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. सगे सोयरे व्याख्या आम्ही जी दिली ती मान्य करायची आणि टिकवायची पण जबाबदारी सरकारचीच आहे, असेही जरांगेंनी सांगितले.

भुजबळ Chhagan Bhujbal म्हणतात यांच्या 57 लाख नोंदी रद्द करा, आम्ही पण मंडल आयोग रद्द करू. त्याला कोर्टात चॅलेंज करू. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण द्या, नाही टिकले तरी चालेल, असेही जरांगेंनी यावेळी सांगितले. आज आरक्षणाची किंमत सगळ्यांना कळायला लागली सरकारने आरक्षण नाही दिले तर पुन्हा मुंबईला जावे लागणार आहे. तुम्ही येणार का? सरकारने मला माझ्या समाजाला घेरायचे ठरवले आहे, तुम्ही साथ द्या, जरांगेंनी असे आवाहन करताच गर्दीतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT