Manoj Jarange Minister Dhananjay Munde  sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange : धनंजय मुंडे हत्येत सापडलास, तर राज्यात फिरू देणार नाही; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानं वातावरण तापलं

Manoj Jarange Minister Dhananjay Munde Beed Parbhani Sarpanch Santosh Deshmukh murder case : परभणी इथं निघालेल्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्वपक्षीय मोर्चात मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : संतोष देशमुख हत्याप्रकरणी परभणी इथं निघालेल्या मोर्चात मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेत, थेट इशारा दिला. 'संतोषभैय्याच्या हत्येत थोडा जरी सापडला, तरी मंत्री धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देणार नाही', असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांनी मंत्री मुंडे यांचे नाव घेऊन थेट इशारा दिल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. पुण्यात पाच तारखेला मोर्चा निघणार आहे. या मोर्चात आणखी मोठी भूमिका मांडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

धनंजय देशमुख गुरूवारी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांना काहींनी धमकावले. हाच धागा पकडत मनोज जरांगे यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना इशारा दिला. ते म्हणाले, "देशमुख कुटुंबियांच्या केसाला जरी धक्का लागल्यास, धनंजय मुंडे यांना रस्त्याने फिरू देणार नाही. इथं माणसांची मुडदे पडायला लागली आहेत. लेकरं उघडण्यावर पडायला लागलीत. आणि हे लोकं मारणाऱ्यांना घरात संभाळत आहेत", असा घणाघात केला.

ही सर्व आरोपी पुण्यातून (Pune) कशी बाहेर येऊ लागली आहेत. पुण्यात यांना कोण संभालत होते. सगळे आरोपी पुण्यात कसे काय सापडायला लागली. तुमच्या सरकारमधील मंत्री आरोपी संभाळत आहे का? असा आरोप मनोज जरांगे यांनी करत चौकशी करण्याची मागणी केली.

"या घटनेशी निगडीत असलेल्या खंडणी, हत्येतील सर्व आरोपींची नार्को चाचणी करावी. या आरोपींनी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे, त्यांना सहआरोपी करावे. दोषारोपपत्र दाखल करताना एकही आरोपी बाहेर आला, तर गाठ आमच्याशी आहे. सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे. दोषारोपपत्र कच्च झाल्यास, आरोपी सुटल्यास मंत्र्यांना गोट्यानं हाणला म्हणून समजा", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

"आम्ही न्याय मागितला की, लगेच षडयंत्र होते. इथं आरोपींना संभाळत, गाड्यांमध्ये घेऊन फिरताना, तेव्हा यांना षडयंत्र वाटत नाही का? आरक्षण मागितलं की, लगेच जातीवादी! आता खूप झालं! समाजावर अन्याय व्हायला लागल्यावर आता गप्प बसून चालणार नाही. घरात घुसून बाहेर काढावा लागेल, असा म्हणत, थोडं सापडू द्या. मी आका-बाका करत बसणार नाही. थेट नाव घेणार. मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव थोडं जरी आलं, तर राज्यात फिरू देत नसतो. नाही म्हणजे, नाही. यांना सुट्टीच नाही", असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT