Manoj Jarange at Patoda 
मराठवाडा

Manoj Jarange: डॉक्टरांनी ICUत उपचार घेण्याचा सल्ला दिल्यानंतर पाटोद्यातून मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Manoj Jarange: १९ तारखेला मुंबई पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. पण त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असल्यानं डॉक्टरांनी त्यांना ICUत उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

Amit Ujagare

Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. १९ तारखेला मुंबई पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. पण त्यांची प्रकृती अत्यंत खालावलेली असल्यानं डॉक्टरांनी त्यांना ICUत उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. यापार्श्वभूमीवर सध्या बीड जिल्ह्यातील पाट्योद्यात असलेल्या जरांगेंनी पत्रकार परिषदेतून मोठी घोषणा केली.

जरांगे म्हणाले, मी मेलो तरी मागं हटणार नाही. महाराष्ट्रातील ५ टक्के मराठा समाज ज्याला आत्ता आम्ही थांबवलं आहे त्यांना मुंबईत कधी बोलवायचं हे मी आज आत्ताच सांगणार होतो. पण काहीतरी सरकारनं ड्राफ्ट पाठवला आहे त्यामुळं मी त्यांना थांबवलं आहे. मी तारीख जाहीर करणार होतो. मी मुंबईच्या दिशेनं चाललो आहे मला आज सलाईन लावल्यामुळं उठता आलं नाही. नारायणगडाचे महंतांनी मला सलाईन लाऊन घेण्याची विनंती केली होती. त्यांनी तासभर माझ्याशी चर्चा केली आणि माझ्यासाठी तुम्हाला सलाईन घ्यावी लागेल असं म्हटलं त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन मी सलाईन लावून घेतलं.

मला सध्या उठताही येत नाहीए आणि बसताही येत नाहीए. पोटात, हाता-पायात मला प्रचंड आग होत आहे. पण ठीक आहे मला उठता आलं नाही किंवा माझ्या मार्गेनं जाता आलं नाही. पण यात काही विशेष नाही तर उद्या १ नंतर मुंबईकडं निघणार आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुंबईला मराठ्यांनी कधी यायाच? याची तारीख मी आजच सांगणार होतो. पण सरकारविरोधात ड्राफ्ट आला आहे, त्यामुळं मी आजचं मराठ्यांना थांबवलं आहे. माझ्या डोक्यात सध्या सरकारबाबत प्रचंड चीड आहे कारण ते सारखंच फसवत आहेत.

मी १८ तारखेला आझाद मैदानात पोहोचणार आहे, त्यांतर १९ तारखेला प्रत्यक्ष उपोषणाला बसाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पण मी मराठ्यांना आवाहन केलं की, रस्त्यात आमच्या गाड्या कोणीही थांबवू नका. पण १७ तारखेला मुंबईत शिरण्यास मला नकार दिला तर मग मी संपूर्ण मराठ्यांना बोलावलणार. यावेळी किती माणसं घेऊन येणार असं मुंबई पोलिसांनी विचारल्यानं मनोज जरांगे हे प्रचंड संतापले. नेमकं काय सांगायचं तुम्हाला? असं असतं का? अक्कल नाही पोलीस अधिकाऱ्यांना अशा शब्दांत जरांगेंनी पोलिसांवरही आगपाखड केली. तसंच हे मुंबई पोलीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणार आहेत, असंही जरांगे यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT