Manoj Jarange Maratha Reservation  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवतेय ? जरांगेंचा सवाल

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. मंगळवारी (२४ ऑक्टोबर) ही मुदत संपली.

अनुराधा धावडे

Jalna Political News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी यांनी राज्य सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. मंगळवारी (२४ ऑक्टोबर) ही मुदत संपली. सरकारने या ४० दिवसात आरक्षण दिले नाही तर ४१ व्या दिवसापासून मी पुन्हा उपोषण करेल असा इशाराही त्यांनी दिला होता. अशातच राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण देण्यापासून कोण अडवत आहे, त्याचा शोध घ्या, असे म्हणत मनोज जरांगेंनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

गिरीश महाजनांचा फोन आला होता. पण माझ्या मित्राकडे होता. त्यामुळे आमचे बोलणे झाले नाही, पण तेही काय बोलणार होते. कायदा पारित झाला हे सांगायला तर त्यांनी नक्कीच फोन केला नसावा, तसे असते तर आता त्यांचा फोन उचलतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याची घोषणा केली. पण तरीही जरांगे आरक्षणावर ठाम आहेत. असे विचारले असता जरांगे म्हणाले, आम्हाला मुख्यमंत्र्यांचा अभिमान आहे. आरक्षण देण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे. पण त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून कोण अडवतेय हे आम्हाला शोधावे लागेल. त्यांच्या शपथेचा आम्ही सन्मान करतो. पण आमच्याही लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षणाशिवाय थांबता येणार नाही.

तुम्ही आज उपोषणाला बसणार का असे विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा होकारार्थी प्रतिसादही दिला. आरक्षण देताना टिकणारे आरक्षण द्यायला हवे, जर सरकारनेच टिकणारे आरक्षण दिले नाही तर ते सर्वोच्च न्यायालयातही टिकणार नाही. मग बाकीच्यांना कशातून आरक्षण दिले. आरक्षण कशात बसते, मराठ्यांनी सर्व निकष पार केलेत की नाही,मग काय अडचण आहे.

माळी समाजाचा काय व्यवसाय आहे, कुणबी समाजाचा काय व्यवसाय आहे. त्यांना कशाच्या आधारावर आरक्षण दिले, हा आमचा प्रश्न आहे, दुसरा कोणता निकष आहे का, त्या निकषात आम्ही बसतो की नाही तेही आम्ही सांगतो. कारण काय आहे. तुम्ही तीस दिवसांचा वेळ मागितला आम्ही ४० दिवस दिले. सरकार काय काम करत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT