Manoj Jarange Patil Uposhan in Antarwali : शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंची बाजू घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर सभेत छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून, मराठ्यांना आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतरही जरांगे आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम राहिले. (Latest Marathi News)
'याआधी आम्ही वेळ दिला आहे. मात्र, काही घडले नाही. आम्ही हक्कासाठी लढत राहू, असे सांगून मागणीपासून तसूभरही मागे हटणार नसल्याचेच जरांगेंनी जाहीर केले. ठाकरे यांच्या भाषणानंतर आणि शिंदेंच्या सभेदरम्यान जरांगेंनी एका वृत्तवाहिनी मुलाखत दिली. तेव्हा आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगेंच्या बोलण्यातून स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पहिल्या टप्प्यातील उपोषण स्थागित झाल्यानंतर आणि ४० दिवसांचा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे आता नव्याने ॲक्शन मोडवर आले आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत शांत राहून २५ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण करण्याचा जरांगेंचा इरादा आहे.
मराठ्यांच्या आंदोलनांची व्यापकता जाणून आरक्षणाला पाठिंबा देण्याची स्पर्धा राजकीय पक्षांत लागली आहे. मात्र, त्याकडे पूणर्पणे कानाडोळा करीत जरांगे हे उपोषण सुरू करणार आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्हानिहाय साखळी उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, जोपर्यंत आरक्षण जाहीर होणार नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश न देता गावबंदी करण्यात येणार आहे.
दरम्यान, आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन अधिक सविस्तरपणे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.