Manoj Jarange Patil News  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange: आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार; विधानसभेच्या आखाड्यात उतरणार!

Mangesh Mahale

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आरक्षण प्रश्नावरून मोठे विधान केले आहे. आता आरक्षण प्रश्नावरुन कोणालाही विनंती करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठ्यांना सहा जूनपर्यंत आरक्षण दिले नाही तर विधानसभेच्या आखाड्यात (Maharashtra Assembly Election) उतरणार असून महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठ्यांच्या एकीची भीती सत्ताधाऱ्यांना स्पष्ट दिसत आहे. इतर राज्यात एकाच टप्प्यात लोकसभा निवडणुका घेतल्या गेल्या. महाराष्ट्रात मात्र पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मोदी सभा घेत आहेत याच्यातच आमचा विजय असल्याचे देखील मनोज जारंगे पाटलांनी सांगितले.

मराठा आंदोलकांवर खोट्या केसेस होत आहे, हे थांबवा असे सांगत जरांगे यांनी मराठ्यांना सग्या सोयऱ्यातून आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी त्यांना दोनदा केली. मी पण क्षत्रिय मराठा आहे, आता पुन्हा विनंती करणार नाही, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.

"आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा जरांगेंनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडे -मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर

शाब्दिक विधानावरून आमने-सामने आलेले महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं.बीडच्या नारायणगड संस्थांच्या फिरत्या नारळी सप्ताहाला सिरसमार्ग येथे दोघांनी हजेरी लावली होती. व्यासपीठावर पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील येताच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला अन् पंकजा मुंडे यांनीही कार्यकर्त्यांना सूचना करत शांत बसण्याचे आवाहन केले. अचानक व्यासपीठावर गर्दी वाढल्याने तारांबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT