Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : फडणवीसांचा सलाईनमधून विष देण्याचा डाव; जरांगेंचा खळबळजनक आरोप

Manoj Jarange Patil Allegations on Devendra Fadnavis : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत...

सरकारनामा ब्यूरो

Maratha Reservation Manoj Jarange patil News :

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. Devendra Fadnavis यांना माझा बळी घ्यायचा आहे. मी मुंबईत सागर बंगल्यावर येतो. माझा बळी घ्यायचाय ना तुम्हाला घ्या, असे म्हणत जरांगे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मी सागर बंगल्यावर येतो घाला मला गोळ्या, असे जरांगे म्हणाले.

आजची शेवटची आणि निर्णयाक बैठक आहे. मी एक सामान्य घरातून आलोय. मराठा समाजातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. समाजावर माझं प्रेम आहे. मी जर स्वार्थी, लबाड असतो तर कधीच उघडा पडला असतो. मी समाजावरची माझी निष्ठा ढळू दिली नाही. मराठ्यांना हरवण्याचं स्वप्नं कुणीतरी बघतंय. त्यामुळे ही निर्णायक आणि शेवटची बैठक आहे. ही बैठक नंतर घेणार होतो. पण लवकर घेण्याची वेळ आली आहे, असे जरांगे म्हणाले.

छत्रपतींच्या समक्ष मी तुम्हाला सांगतो, मी कुठल्याच पक्षाचा नाही आणि कोणत्याच पक्षाच्या वतीने काम करत नाही. उद्धव ठाकरेंचं सरकार असतानाही मी कठोर भाषेत बोललो होतो. आता यांचं सरकार आहे आणि आताही बोलतोय. म्हणून मी कोणत्याही पक्षाचा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगेनी काय केले आरोप?

सरकारने दिलंय 10 टक्के आरक्षण. आपण मागतोय मराठ्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण. हे आरक्षण सिद्ध झालं आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे हेही सिद्ध झालं आहे. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सग्यासोयऱ्यांचा कायदा करा, अशी आपली मागणी आहे. सरकारने आणि आपण मिळून सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे, असे ते म्हणाले.

> हे सगळं जे कोण करतंय, त्या मागे एकटे देवेंद्र फडणवीस आहेत. मला घेरण्यात आलं आहे.

> यात एकनाथ शिंदे यांचेही दोन-चार लोक आहेत. अजितदादांचेही दोन आमदार आहेत.

> सग्यासोयऱ्यांचं होऊ देत नाहीत आणि 10 टक्के आरक्षण काही करून मराठ्यांवर लादायचा प्रयत्न सुरू आहे.

> हे ऐकतच (मनोज जरांगे ) नाही. यामुळे एकतर हे संपले पाहिजे. नाहीतर याचा गेम तरी करावा लागेल. त्याला बदनाम तरी करावं लागेल. सलाईनमधून विष देऊन का होईना संपवावं लागेल. किंवा याचं एन्काउंटर तरी करावं लागेल, हे देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आहे. हे सर्व देवेंद्र फडणवीसांना वाटतंय.

> देवेंद्र फडणवीस यांना सांगतो, बैठक संपल्यावर मी सागर बंल्यावर येतो, मला मारून टाका.

> तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे ना, माझा बळी पाहिजे ना. मी तुझ्या सागर बंगल्यावर येतो, घ्या माझा बळी. मी समाजाशी असलेली इमानदारी नाही सोडू शकत.

> 10 टक्के आरक्षण घेणार नाही. त्यामुळे माझ्या तोंडून वधवून घेण्यासाठी फडणवीसांनीच अजय महाराज बारस्करांना उभं केलं आहे.

> मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी बारस्करला सोडलेलं आहे. पत्रकारांवरही दबाव आहे. बच्चू कडूंनाही बाजूला केलं आहे. आता बारस्करला मोठं केलं जात आहे. या मागे देवेंद्र फडणवीस आहेत.

> बारस्करला सगळी ताकद दिली. आपल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा. यासाठी देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. त्यात काही समन्वयकही आहेत. मुंबईतील चार पाच समन्वयकही आहेत, ज्यांची दुकानं बंद पडलेली आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या मागे फिरतात. वेळ आली की त्यांचीही नावं जाहीर करणार आहे.

> मला बदनाम करण्यासाठी काही जण मुंबईत आहेत. नारायण राणेंनी त्यांना नेलं आहे. नारायण राणेहे फडणवीसांचे ऐकून काम करत आहेत.

> देवेंद्र फडणवीस म्हटले तर एका मिनिटांत सगेसोयऱ्यांचा कायदा होईल. पण एकनाथ शिंदेंना हे करू देत नाहीत. हे सगळं षडयंत्र आहे.

> देवेंद्र फडणवीस का असे करतायेत? हे सांगतो. लाठीमार झाला त्यावेळी काही माता भगिनी जखमी झाल्या. त्यांची माफी मागायला लावली, याचा राग त्यांच्या डोक्यात आहेत. म्हणून हे सगळं फडणवीस करतायेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT