Manoj Jarange News : आरोपांचे बॉम्ब फोडणार म्हणणाऱ्या बारस्करांना जरांगेचे प्रत्युत्तर; "असल्या भंगार..."

Maratha Reservation News : आपल्याला अटक केले जाईल, असाही आरोपही त्यांनी केला आहे.
Manoj Jarange News
Manoj Jarange NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आंदोलनासाठी लढाई पुकारणारे मनोज जरांगे पाटलांविरोधात त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारस्करांनी काही गंभीर आरोप केले आहेत. बारसकर हे वारंवार जरांगे पाटलांविरोधात भूमिका मांडत आहेत. आजही पत्रकार परिषद घेऊन बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. यावर जरांगेंनी बारस्करांना आरोपावर टिप्पणी केली आहे. (Manoj Jarange Patil News)

Manoj Jarange News
Maratha Reservation : जरांगे पाटलांचा थेट मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांना इशारा; 'त्याला' आवर घाला अन्यथा...

दुसरीकडे मनोज जरांगे यांनी बारस्कर यांच्यावर आता पलटवार केला आहे. मला अजय बारस्कर यांच्यासारख्या भंगार-भुंगार लोकांबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. त्याच्यावर बोलायला आम्ही मोकळे नाही. त्याचा समाचार घ्यायला माझा अख्खा समाज आहे, असे म्हणत त्यांना बारस्करांच्या आरोपावर उत्तर देणे टाळले. सोबत जरांगे यांनी उद्या मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. या वेळी त्यांनी आपल्याला अटक केले जाईल, असाही आरोपही त्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange News
Manoj Jarange Patil News : "ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख कशाला घेईल?" जरांगेंवर बारसकर बरसले!

बारस्कर काय म्हणाले ?

"विरोधात बोलण्यासाठी सरकारकडून 40 लाख रुपये घेतल्याचा जरांगेंनी माझ्यावर आरोप केला होता. माझा सगळ्या मराठा बांधवांना सांगणं आहे, एखाद्या अशा सज्जन माणसावर यापूर्वी एकही आरोप झाला नाही. त्याच्यावर कसले आरोप करता. जरांगेंनी माझ्यावर बलात्कार, विनयभंग, तीनशे कोटींची संपत्ती आता 40 लाख सरकारकडून घेतल्याचा आरोप केला. माझा जरांगेंना जाहीर सवाल आहे, जर जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) म्हणण्यानुसार माझ्याकडे तीनशे कोटींची संपत्ती असेल तर मी 40 लाख घेईन का? असा सवाल बारस्करांनी केला.

"जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणतात माझा आणि बारस्करांचा काही संबंध नाही. मी जरांगेंच्या आंदोलनस्थळी गेलाे म्हणालो पाणी प्या. खरंतर त्यांनीच मला तिथं बोलावलं होतं, मी स्वत:हून तिथे गेलो नाही. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. मी लवकरच पुरावे सादर करणार आहे. यांनी तुकाराम महाराजांना संत अन् फंत बोलून अपमान केला. माझा देहू संस्थानशी काही संबंध नसेल, पण देहू संस्थान हा अपमान कसा सहन करू शकतो? असेही बारसकर म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com