Manoj Jarange Patil, Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : "संपवा-संपवी खात्याचं मंत्री फडणवीसांना करावं, कारण...," जरांगे-पाटलांचा घणाघात

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : "फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी. सत्ता मिळवण्यासाठी काढू नये," असंही जरांगे-पाटलांनी ठणकावून सांगितलं आहे.

Akshay Sabale

मला सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत अपेक्षा नाही. कारण, आरक्षण द्यायचं नाही, असं त्यांचं ठरलं आहे. सरकारला मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावायची आहेत. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. सरकारनं सरळ-सरळ फसवा-फसवी केली आहे, अशी टीका मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे.

शांतता मोर्चाचा शेवट मंगळवारी ( 13 ऑगस्ट ) नाशिकमध्ये झाला. यानंतर बुधवारी आंतरवाली सराटी येथे जरांगे-पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधता. यावेळी जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

"राज्यात एक संपवा-संपवी खातं निघालं पाहिजे. ते खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं पाहिजे. कारण, फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) मराठा, मुस्लिम, धनगर संपवला. त्यासह मोठ्या जाती संपविण्याचं काम त्यांनी केलं. पाच वर्ष काम केलं नाही. फक्त फोडाफोडी त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देतील, पण फडणवीस आरक्षण देऊ देत नाहीत. अजितदादा पवार तर आरक्षणावर बोलतच नाहीत," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

"फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी. सत्ता मिळवण्यासाठी काढू नये. कारण, आरक्षण दिलं नाही, तर सत्ता मिळतच नसते. मराठा आणि धनगर समाज राज्यात मोठे आहेत. या दोन समाजाला संपवण्याचं काम फडणवीसांनी केलं," असा आरोप जरांगे-पाटलांनी केला आहे.

"सगळे माजी आणि आजी मुख्यमंत्री माझ्याविरोधात उतरले आहेत. अशोक चव्हाण, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सगळे माझ्याविरोधात आहेत. त्यासह सगळेच उपमुख्यमंत्री सुद्धा माझ्याविरोधात आहेत. माझा असा अंदाज आहे की फडणवीस जाणून बुजून आरक्षण मिळून देत नाही," असा दावाही जरांगे-पाटलांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT