Chhagan Bhujbal : "माझा 'करेक्ट कार्यक्रम' फक्त...", मोजक्या शब्दांत भुजबळांनी जरांगे-पाटलांचा विषय संपवला

Manoj Jarange Patil Vs Chhagan Bhujbal : जरांगे-पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यातच जरांगे-पाटलांनी थेट नाशिकमध्ये जाऊन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला होता. याला भुजबळ यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal |Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : मराठा समाजाचे नेते, मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील विस्तव जाण्याचं नाव घेत नाही. मंगळवारी जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला होता. भुजबळ ही नाशिकला लागलेली साडेसाती आहे. येत्या निवडणुकीता हा डाग पुसून येवल्याचं नाव पवित्र करणार आहे.

मला म्हणतो, 8 जागा तरी निवडून आणून दाखव. तुझाच 'कार्यक्रम' करतो बघ, असा एकेरी उल्लेख करत जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला होता. जरांगे-पाटील यांच्या टीकेवर काही शब्दांत प्रत्युत्तर देत भुजबळ यांनी विषयच संपवला आहे.

मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप बुधवारी नाशिकमध्ये झाला. त्यावेळी 56 मिनिटांच्या भाषणात जरांगे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ यांच्यावर घणाघाती प्रहार केला.

जरांगे-पाटील भुजबळांवर काय म्हणाले?

"छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) ही नाशिकला लागलेली साडेसाती असून येत्या निवडणुकीत हा डाग पुसून येवल्याचे नाव पवित्र करणार आहे. मला म्हणतो, 8 जागा तरी निवडून आणून दाखव. तुझाच कार्यक्रम करतो बघ. तुझ्याच जिल्ह्यातील तुझे उमेदवार निवडून येतात की बघ आधी. भुजबळने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, आता फडणवीसांच्या माध्यमातून तो भाजप फोडेल. ज्याने मराठा आरक्षणाला त्रास दिला त्याला आडवे केलेच समजा. भुजबळ एकदाच नादी लागला तर त्याला नाशिकदेखील सोडू दिले जाणार नाही. त्याचा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार," असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला.

भुजबळांचं जरांगे-पाटलांना प्रत्युत्तर काय?

जरांगे-पाटील यांच्या विधानाबद्दल प्रसारमाध्यमांनी छगन भुजबळ यांना प्रश्न विचारल्यावर त्यांचा कोण 'करेक्ट कार्यक्रम' करू शकतो, यांचं थेट नावच घेतलं आहे. "माझा करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वर करू शकतो. दुसरं कोणी करू शकत नाही," असं छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं आहे.

जरांगे-पाटील फडणवीसांवर काय म्हणाले?

"राजकारणात फडणवीस यांनी अनेकांना मातीत घातले, अनेकांना पाणी पाजले पण त्यांना मी वस्ताद भेटलो. फडणवीस तुम्ही राजकारण करू नका, आमचे नेमके काय चुकले? ते तरी सांगा. मात्र, केवळ आरक्षण द्यायचे नाही म्हणून षडयंत्र रचू नका. मी कुणाला मॅनेज होत नाही आणि फुटत नाही. आम्हाला राजकारणात यायचे नाही पण तुम्ही आम्हाला तसे करण्यास भाग पाडू नका," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com