Chhagan Bhujbal & Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Jarange Vs Bhujbal : "भुजबळांना थोड्या दिवसांत जनावरांचं इंजेक्शन अन् गोळ्या घ्याव्या लागणार"

Akshay Sabale

छगन भुजबळ गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचा तळतळाट घेत आहेत. मराठे 50 ते 55 टक्के आहेत. सरकार कसं आरक्षण देत नाही ते पाहतो.

येवल्यातील्या व्यक्तीनं कितीही दबाव आणला, आडवे आले आणि भारत एक केला तर ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवणार, असं आव्हान मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ ( chhagan Bhujbal ) यांना दिलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण ( Obc Reservation ) देता येत नाही, असं चार आयोग आणि सर्वोच्च न्यायालायनं सांगितल्याचं विधान छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावरून मनोज जरांगे-पाटील यांनी एकेरी उल्लेख करत भुजबळांचा समाचार घेतला आहे.

जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) म्हणाले, "ते ( भुजबळ ) येडेच आहेत. त्यांना राष्ट्रपती करायला हवं. आयोगाचा आणि ओबीसी आरक्षणाचा संबंध काय? ते स्वत:ला हुशार समाजतात का? त्यांनी कशाला संवैधानिक पदावर बसायचं. आयोग 50 टक्क्यांवरील आरक्षण देण्यासाठी आहे. मराठा समाज 50 टक्क्यांच्या आतमध्ये ओबीसी समाजात आहे. त्यांना थोडीतरी बुद्धी आहे का? त्यांना थोड्या दिवसांत जनावरांचे इंजेक्शन आणि टपोऱ्या, टपोऱ्या ( मोठ्या ) गोळ्या नरड्यात घालाव्या लागणार आहेत."

"माजी आणि विद्यमान आमदार मराठा समाजासोबत असल्याचं पत्र देत आहेत. आमदार सोबत राहिले नाही, तर त्यांचं राजकीय जीवन संपेल. सरकार 13 जुलैपर्यंत आरक्षण कसं देत नाही, ते पाहतो. भुजबळांच्या दबावाखाली येऊन काही काड्या केल्या आणि मराठ्यांना आरक्षण दिलं नाही, तर सरकारला जड जाईल," असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT