BJP Marathwada News : अब की बार का फसले ? मराठवाड्यात भाजपच्या पराभवाचा 'हे' नेते घेणार शोध !

Lok Sabha Election 2024 : जालना वगळता लातूर, बीड आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभा घेतल्या होत्या. तर जालन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेतली होती.
Bjp Marthwada
Bjp MarthwadaSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात 'अब की बार चार सौ पार अन् महाराष्ट्रात मिशन-45', घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपला सपाटून मार खावा लागला. मिशन तर फेल झालेच पण गेल्यावेळी जिंकलेल्या महाराष्ट्रातील 22 जागाही भाजपला राखता आल्या नाही. मराठवाड्यात भाजपने जालना, बीड, नांदेड, लातूर या चार मतदारसंघात उमेदवार दिले होते.

हे चारही उमेदवार पडले. आता या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपने काही नेत्यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत ते आढावा घेऊन अहवाल सादर करणार आहेत. त्यानूसार जालना लोकसभा मतदारसंघासाठी राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील,लातूर-आमदार संजय कुटे, बीड-संभाजी पाटील निलंगेकर तर नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आढावा राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे घेणार आहेत. मराठवाड्यातील या चारही मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार होते.

Bjp Marthwada
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे विधानसभेच्या आखाड्यात उतरून अब्दुल सत्तारांचा वचपा काढणार?

यापैकी जालना, लातूर आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात पक्षाने विद्यमान खासदारांनाच पुन्हा मैदानात उतरवले होते. तर बीडमध्ये विद्यमान खासदार प्रितम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे असा बदल करण्यात आला होता. विशेष म्हणजे जालना वगळता लातूर, बीड आणि नांदेड लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः सभा घेतल्या होत्या. तर जालन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेतली होती. एवढी ताकद देऊनही मराठवाड्यातील या चारही जागा भाजपच्या हातून गेल्या. जालना लोकसभा मतदारसंघात सलग सहाव्यांदा निवडणूक लढवणारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव भाजपसाठी धक्कादायक मानला जात आहे.

Bjp Marthwada
Assembly Election 2024 : विधानसभेसाठी 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? ठाकरे अन् पवार 'एवढ्या' जागा लढविण्याची शक्यता

नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतरही भाजपला ही जागा राखता आली नाही. लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांच्याविरोधात वातावरण असतांना भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी देण्याची जोखीम पत्करली. तर बीडमध्ये राज्यातील मंत्री धनंजय मुंडे सोबत असून पंकजा मुंडे यांचा थोडक्यात पराभव झाला. मराठा (Maratha) आरक्षणाच्या मुद्यावरून समाजामध्ये सरकारविरोधात असलेली नाराजी हे प्रमुख कारण भाजपच्या उमेदवारांच्या पराभवामागे असल्याचे बोलले जाते. आता भाजपच्या ज्या नेत्यांवर या चारही लोकसभा मतदारसंघातील पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, ते कोणते वेगळे कारण शोधतात? हे पहावे लागेल.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com