प्रविण दरेकर हे तमाशातील नथ नसलेली मावशी आहेत. त्यांना फक्त मला बदनाम करायचं आहे. दरेकर यांनी काय करायचे, ते करावं. मी मरायला तयार आहे. दरेकरांच्या डोक्यात फक्त देवेंद्र फडणवीस आणि सत्तेचं भूत घुसलं आहे, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली आहे.
मराठे काहीही करू शकतात. विधानसभा निवडणुकीत भाजपचे ( bjp ) उमेदवार पाडून शरद पवार ( Sharad Pawar ), उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून आणतील, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला आहे. ते अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, "मराठ्यांच्या मुलांना वेदना झाल्यानं मी बोललो. मी दरेकर ( Pravin Darekar ) यांचं नाव घेतलं नाही. कधी घेतंही नाही. मी तुमच्यावर थुंकतंही नाही. मराठा समाजातील एका मुलीच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा दरेकरांनी अपमान केला आहे. म्हणजे समस्त महाराष्ट्रातील मराठ्यांच्या मुलांचा दरेकरांनी अपमान केला."
"मराठा क्रांती आणि मराठा ठोक मोर्चा दरेकरांनी संपवला आहे. या कटात आणखी पाच ते सहा जणांचा समावेश आहे. तुम्ही स्वत:च्या स्वार्थासाठी दरेकरांनी जातीला मारलं आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांसाठी ( Devendra Fadnavis ) काय काय करता? कोणत्या बँकेत घोटाळा करायचा? मागच्या दारातून आमदार कसं व्हायचं? तुमच्यामुळे बीडचा एक आमदार बँकेच्या घोटाळ्यात अडकला आहे. फडणवीस तुम्हाला कशामुळे सांभाळत आहेत? तुम्ही किती घोटाळा केलाय? हे सगळं आम्हाला माहिती आहे," असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.
"विधान परिषदेवर गेलेल्या आमदारांना फक्त माझ्याविरोधात बोलायला ठेवलं आहे. फक्त तुम्ही मराठ्यांचे नेते आहात, म्हणून मी बोलत नव्हतो. पण, डोळे झाकून दूध पितात, असं दरेकरांना वाटत असेल. पण, सगळं जग तुमच्याकडे बघत आहे," असंही जरांगे-पाटलांनी ठणकावून सांगितलं आहे.
"निवडणुकीआधी किंवा निवडणुकीनंतर मला गुंतवलं जाऊ शकते. दरेकर मराठ्यांची लोक फोडत आहेत. त्यामुळे भाजपमधील मराठ्यांनी आता जागा होण्याची वेळ आहे," असं आवाहन जरांगे-पाटलांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.