Manoj Jarange News : 'ज्या सत्तेपासून माझ्या समाजाला त्रास होताेय, त्याच सत्तेत...' ; मनोज जरांगेंचं बीडमध्ये विधान!

Maratha Reservation : शासनाला वाटलं मी माघार घेईल, पण मी मागे हटलो नाही, असंही जरांगे म्हणाले आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : 'आमचं भांडण सरकारशी आहे, पोलिसांशी नाही. पोलिस प्रशासन नियम फक्त आम्हालाच लावते आहे, इतरांना का नाही? मराठ्यांनी शासनाचे व पोलिसांचे एवढे काय केले?, असा सवाल करत मराठ्यांनो तुम्ही शहाणे व्हा, अन्याय झाला तर एकमेकांच्या मदतीला जा, आरक्षणात खूप मोठी ताकद आहे. नुकतेच 11 भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी झालेत. शासनात व प्रशासनात मराठ्यांचा टक्का वाढवायचा हेच काम आपल्याला करायचे आहे,' असे मत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केले आहे.

मनोज जरांगे मंगळवारी बीड जिल्हा दौऱ्यावर होते. तालुक्यातील पेंडगाव येथील जागृत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सानिमित्त दर्शन घेतले. या वेळी कार्यक्रमात मनोज जरांगे बोलत होते. मनोज जरांगे म्हणाले, 'मेलो तरी हरकत नाही, पण आता लढायचं ठरवलंय. ज्या सत्तेपासून माझ्या समाजाला त्रास होतेय त्याच सत्तेत आपल्याला बसायचं आहे. तुमचे काम मंत्री करत नाहीत ना, आता सरकार तुमचं आणा. पक्षांच्या टोप्या घालणे बंद करा.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange Patil
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेच राजकारणातले खरे हिरो नंबर वन...

'प्रचाराला व सभेलाही जाऊ नका, नारायणगडाच्या सभेच्या तयारीला लागा, विधानसभेला परिवर्तन करायचं आहे, देणारे बनायचं शिका, असे आवाहन करत त्यांनी गृहमंत्री फडणवीसांवरही टीका केली. 'गृहमंत्र्यांनी ठरवलं होतं, पोरांना जास्त गुन्हेगार बनवायचं, मात्र, जितका त्रास होणार तितका मी त्यांच्यावर तुटून पडतोय. मी जिथे सभेला जाईल तिथे गुन्हे दाखल केले जात आहेत,' असं ते म्हणाले.

याशिवाय 'शासनाला वाटलं मी माघार घेईल, पण मी मागे हटलो नाही. गुन्हे दाखल केल्याने तरुण घाबरतील, असे त्यांना वाटले होते. उलट आता समाजातील मुलं अधिक जोमाने कामाला लागली आहेत. धनगर, मराठा, मुस्लिम, दलित एकत्र आले तर सरकारमधल्या एकाचीही सीट लागणार नाही,' असंही जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil
Lok Sabha Election 2024 : लोकसभा प्रचारासाठी खास तयार केलेली अंबादास दानवेंची व्हॅनिटी व्हॅन कुठंय?

याशिवाय, '93 मतदारसंघांमध्ये मराठ्यांच्या मतावर आमदार होतात. प्रत्येक मराठा समाज बांधवांच्या वाहनांवर ‘चलो नारायणगड’ असे पॉम्प्लेट लावा. मराठ्यांना आरक्षण नाही असे शासन म्हणत होते, मलाही शासन धमकावत होते. मी म्हटलं काय व्हायचे ते होऊ द्या. आपल्याला दंगल होण्याची भीती दाखवली जाईल. मात्र दंगल आपण होऊ दिली नाही. हेच आरक्षण 40-45 वर्षांपासून जर लावून धरल असतं, तर आज आरक्षण पदरात पडल असतं. समाजातील लाखो पोरांना केंद्रात व राज्यात नोकऱ्या लागल्या असत्या कोणापुढे झुकायची गरज पडली नसती,' असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com