Manoj Jarange Patil Defender Car Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : अखेर 'ती' डिफेंडर गाडी मनोज जरांगेंनी परत पाठवली! नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील यांनी वापरलेली डिफेंडर गाडी अखेर मूळ मालक सुभाष भोसले यांच्यासोबत सोलापूरला रवाना करण्यात आली.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवाली सराटीतून सुरु झालेल्या लढ्याने काय मिळाले, काय गमावले? यावर समर्थक-विरोधकांकडून नेहमीच चर्चा झडत असतात. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेला हा राज्य सरकार विरुद्ध मराठा समाजाच्या संघर्षाला विविध पैलू, वादाच्या किनार देखील आहेत.

गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आपल्या दौऱ्यात वापरत असलेल्या डिफेंडर गाडीची चर्चा राज्यभरात रंगली. गरजवंत मराठ्याचा लढा देणारे मनोज जरांगे पाटील एवढ्या अलिशान गाडीतून कसे फिरतात? ही गाडी त्यांना कोणी दिली? यासाठी एवढा पैसा कुठून आला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

त्याला मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः आणि त्यांच्या समर्थकांनी आपापल्या पद्धतीने उत्तरे दिली. पाटोदा येथे आंदोलन स्थगित करून १७ सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारासाठी दाखल झाले. काल मंगळवारी (ता.२९) रोजी त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

तिथून अंतरवाली सराटी येथील आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्या दिमतीला तीच डिंफेडर कार उभी पाहून अनेकांच्या भुंवया उंचावल्या गेल्या. जरांगे पाटील याच गाडीतून अंतरवालीत दाखल झाले आणि रात्री राज्यभरात चर्चेचा आणि जरांगे पाटील यांच्यावर टीकेचा विषय ठरलेली ती डिफेंडर गाडी मूळ मालक भोसले यांच्यासोबत त्यांच्या सोलापूर जिल्ह्यात परत पाठवण्यात आली.

गेल्या महिनाभरात मराठा आरक्षणाच्या दृष्टीने घडलेल्या अनेक घडामोडी घडल्या. या सगळ्या प्रवासात डिफेंडर गाडी आणि त्या अनुषंगाने वाद मनोज जरांगे पाटील यांनी अनुभवले. राज्य पातळीवर या अलिशान गाडीची चर्चा झाल्यानंतर ती जणू सेलिब्रेटीच बनली होती. अंतरवाली असो की जिथे मनोज जरांगे पाटील जातील तिथे या गाडीसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी व्हायची.

काल सांयकाळी ही डिफेंडर गाडी आपल्या मूळ मालकासोबत सोलापूरला रवाना करण्यात आली. यासोबत या गाडीवरून सुरू झालेल्या वादावरही पडदा पडला, असे बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील वापरत असलेली पांढऱ्या रंगाची लँड रोव्हर डिफेंडर गाडी सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील व्यापारी व शेतकरी सुभाष भोसले यांची होती.

भोसले यांनी ही नवी डिफेंडर जरांगे पाटील यांना वापरण्यासाठी दिली होती. जरांगे यांचा प्रवासाचा त्रास कमी व्हावा आणि त्यांनी आपल्या गाडीत बसावे, या इच्छेने गाडी दिली, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. या गाडीची किंमत1.90 कोटी असून ती खरेदी करण्यासाठी भोसले यांनी 1.50 कोटी कर्ज घेतल्याचे स्पष्ट केले होते.

वादाचे मुळ ठरत असलेली ही गाडी मनोज जरांगे पाटील यांनी परत घेऊन जा असे भोसले यांना सांगीतले होते. त्यानूसार काल 29 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत परतल्यानंतर भोसले यांनी ती परत नेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT