Manoj Jarange Demands  sarkarnama
मराठवाडा

Prasad Lad meets Jarange Patil : पाणी पितो, सलाईन लावतो पण उपोषण सोडणार नाही; जरांगे पाटलांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम

Jarange Patil Hunger Strike News :गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी भेट घेतली.

सरकारनामा ब्युरो

Jalna News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा बुधवारी पाचवा दिवस आहे. राज्य सरकारच्यावतीने बुधवारी आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारकडून करण्यात आल्या असल्याचे यावेळी आमदार लाड यांनी सांगितले. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पितो, सलाईन लावतो पण उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. सर्व मागण्यांची अंमलबाजवणी सुरु करा त्यानंतर उपोषण सोडतो, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

गेल्या पाच दिवसापासून उपोषण सुरु आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्या मागण्या केल्याचं जाहीरपणे सांगितले. पण असं असूनही मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. किमान चार प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचं वाटप सुरू होऊ द्या मग बघू. इतकंच काय तर हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचे वाटप मराठवाड्यातून सुरू व्हावे, असंही मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले. पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही, यावर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले. सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असं त्यांनी सर्वांसमोर जाहीर केले.

सातारा, कोल्हापूर गॅझेट तीन महिन्यात काढावे, अशी मागणी जरांगे यांनी केली. तुमच्या शब्दाचा मान राखतो, पण उपोषण सोडणार नाही. सलाईन, पाणी घेणार, पण उपोषण सोडणार नाही. सातारा कोल्हापूर गॅझेटसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.

यावेळी जरांगे पाटील यांनी मध्यस्थी करणाऱ्या विखे पाटलांचं नाव घेऊ टीका केली. विखे पाटलांवर विश्वास ठेवला, पण ते आमची शाळा करत आहे, टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली. 12 तारखेपर्यंत सरकार काय करतेय ते बघू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT