Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत मोठी बातमी: सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये, पण अंतरवालीत जाण्याबाबत सस्पेन्स कायम!

Government delegation meets Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मोठी अपडेट. सरकारचं शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झालं असून अंतरवालीला जाण्याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे.
Manoj Jarange patil
Manoj Jarange patilsarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. अद्याप सरकारकडून त्यांच्या मागण्यासंदर्भात कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. किंवा कोणी अंतरवालीत जरांगे यांच्या भेटीसाठी गेलेलेही नाही. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंतरवालीत जाऊन त्यांची भेट घेतली.

मात्र त्यांच्यात काही संवाद मात्र झालेला नाही. जरांगे पाटील यांची प्रकृती आज खालावली आहे. तपासणीसाठी आलेल्या पथकाला त्यांनी तपासणी करू दिलेली नाही. तर दुसरीकडे मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड हे साडेचार वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत.

Manoj Jarange patil
Sanjay Jadhav : मनोज जरांगेंच्या टार्गेटवर असलेल्या खासदार बंडू जाधवांचा मोठा निर्णय; परभणीतील दहीहंडी कार्यक्रम रद्द!

मराठा आरक्षणासंदर्भात यापुर्वीच्या भेटीत मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेली चर्चा, त्यांनी केलेल्या मागण्या, त्यावर सरकारकडून जरांगे पाटील यांना देण्यात आलेली माहिती आणि, जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर चर्चा आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून विखे पाटील, सामंत आणि लाड हे आढावा घेणार आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होत आहे.

सरकारचे हे तीनही नेते अंतरवाली सराटीला जाणार का? याबद्दल मात्र अद्यापही निश्चित माहिती नाही. छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा विमानतळावर विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावर त्यांनी अद्याप अंतरवाली सराटी येथे जाण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे सांगीतले.

आज आम्ही प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून आढावा घेणार आहोत. यापुर्वी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याशी झालेली चर्चा, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यावर प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनंतर काय परिस्थिती आहे, याची माहिती आम्ही जाणून घेणार आहोत.

चर्चे संदर्भात आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही काही निरोप आलेला नाही. अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर अंतरवाली सराटीत जाण्याचा काही निर्णय झाला, तर आपल्याला नक्की कळवू, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. दुसरीकडे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आज खालावल्यामुळे समाज बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Manoj Jarange patil
Manoj Jarange Patil : मराठवाड्यातील वणव्यामागे ठाकरेंच्या आमदाराची काडी? जरांगे पाटील विरुद्ध संजय जाधव यांच्यातील वादाची इनसाईड स्टोरी

सरकारकडून अद्याप आंदोलनाची दखल घेतली गेलेली नसल्याने मराठा समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे. धाराशीव जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. सरकारने तातडीने अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी समाज माध्यमातून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com