Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उन्हात आपले उपोषण सुरू केले आहे. मराठा उपसमितीचे अध्यक्ष. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित करावे, असे आवाहन विखे पाटील यांनी केले.
उपोषण मागे घ्यावे यासाठी विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या आश्वासनांचे ड्राफ्ट दाखवला. या ड्राफ्टमध्ये पाच मोठी आश्वासन देण्यात आली आहे.
त्यामध्ये मराठा आरक्षण कक्ष पुढील एक महिन्यात सुरू करण्यात येईल, नोंदी शोधणे, प्रमाणपत्र वाटप आणि जात पडताळणीसाठी एक हेल्पलाइन 8 दिवसात सुरू करणार, कुणबी प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी एसओपी तयार केली आहे, आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसाना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येईल, कामामध्ये निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, अशी आश्वासने दिली आहेत.
जरांगे पाटील यांनी ड्राफ्ट पाहिल्यानंतर यावर मराठा समाजातील अभ्यासकांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यांनी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अभ्यासकांना आपली मते यावर मांडण्यास सांगितले आहे. तसेच आंतरवाली सराटीमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या दरम्यान, आपले उन्हात उपोषण सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.
त्यावर विखे पाटील यांनी ते म्हणाले, चर्चा होत राहतील, मात्र उपोषण करायेच असेल तर तूर्त सावलीत बसून करा, असा आवाहन त्यांना केले. मात्र, जरांगे पाटील हे उन्हात उपोषण करण्यावर ठाम आहेत.
मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरवात केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाने रस्ता रोको केला. विविध ठिकाणी जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी आंदोलन होत आहे. काँग्रेस खासदार शाहू छत्रपती यांनी देखील जरांगे पाटील यांना पाठींबा दिला आहे. तसेच कोल्हापूर गॅझेट लागू करण्याची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.