Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Maratha Reservation :'....तर सरकारला आणखी वेळ देण्यास तयार'; जरांगे पाटलांची शिष्टमंडळाशी चर्चा

Manoj Jarange Patil Hunger Strike : जरांगे पाटील उपोषण मागे घेण्याची शक्यता

Ganesh Thombare

Jalna News: गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. आता त्यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे पोहोचले असून, उपोषण मागे घेण्याची विनंती शिष्टमंडळ करत आहे.

या शिष्टमंडळामध्ये मंत्री धनंजय मुडे, उदय सामंत, संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यासंदर्भात शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली. या वेळी आणखी काही नोंदी शोधण्यासाठी अजून थोडा वेळ देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

"टिकणारे आणि सरसकट आरक्षण देण्यासाठी वेळ लागणार आहे. यामध्ये काही कायदेशीर त्रुटी आहेत, त्या दूर करायच्या आहेत", असे धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांना सांगितले, तर "सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असेल तर आपण सरकारला वेळ देण्यास तयार आहोत", असे जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

या वेळी निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगे पाटलांना कायदेशीर त्रुटी समजावून सांगितल्या. तसेच सरकार वेळकाढूपणा करत नाही, पण ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांत आरक्षण देता येत नाही. टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी वेळ लागत आहे, त्यामुळे आणखी थोडा वेळ द्यावा, असे निवृत्त न्यायमूर्तींनी जरांगे पाटलांना सांगितले.

यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचे सर्वेक्षण करा, आणखी किती वेळ लागेल ते सांगा, याबाबत जातपडताळणी सुरू करा, पण सर्वेक्षण करण्यासाठी चालढकल करू नका. आम्हाला सरसकट प्रमाणपत्र हवे आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT