MLA Prakash Solanke
MLA Prakash SolankeSarkarnama

Maratha Reservation: 'मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला, घर जाळणारे...; प्रकाश सोळंकेंचा गौप्यस्फोट

MLA Prakash Solanke : आमदार सोळंके यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.

Mumbai News: गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आल्यामुळे राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

तर बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या वाहनांची जाळपोळ करत घर पेटवल्याची घटना घडली. यानंतर आता आमदार सोळंके यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.

"माझ्या घरावर हल्ला करणारे समाजकंटक होते. त्यामध्ये काही स्थानिक अवैध धंदा करणारे लोकं होती. तसेच माझे घर जाळल्याच्या घटनेनंतर मराठा कार्यकर्त्यांनीच माझा जीव वाचवला. ज्यांनी मला संरक्षण दिलं, ज्यांनी माझा जीव वाचवला ते 100 टक्के मराठा समाजाचे लोकं होती", असे प्रकाश सोळंके यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Prakash Solanke
Chandrashekhar Bawankule News : भाजपच्या संकल्प यात्रेत महिलेने बावनकुळेंना सुनावलं; 'सिलिंडर दर वाढले, माती खायची का?'

"राज्यात दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 2011 पासून काम करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी आणि माझे कुटुंबीय त्यांच्या आंदोलनात सहभागी आहोत, पण 30 ऑक्टोबरला माझ्या घरावर हल्ला करण्यात आला. 200 ते 300 जण तयारीनेच आले होते. त्या समाजकंटकांनी दगडफेक करत माझे घर जाळले. या समाजकंटकांकडे पेट्रोल बॉम्ब आणि मोठे दगड होते. हे सर्वजण प्लॅनिंग करून आले होते. हा एक पूर्वनियोजित कट होता", असा गौप्यस्फोट प्रकाश सोळंके यांनी केला.

"हल्ला करणाऱ्यांमध्ये माझे राजकीय विरोधक होते. या जमावामध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त इतर जमातीचे लोक होते. काही लोकं अवैध धंदा करणारेही होती. या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मी पोलिसांना दिले आहेत. यामध्ये आतापर्यंत 21 जणांना अटक करण्यात आली आहे", अशी माहितीही त्यांनी दिली.

'पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली...'

"जाळपोळीची घटना घडली, हे गृहविभागाचे अपयश आहे. जेव्हा घटना घडली, तेव्हा पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. माझ्या समोर एक जण घरावर दगड फेकत होता. मात्र, पोलिस फक्त उभे होते, त्यांनी काही केले नाही. याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याबरोबर माझे बोलणे झाले असून, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली हे मी त्यांना सांगितले आहे", असेही प्रकाश सोळंके म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

MLA Prakash Solanke
Maratha Reservation: जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या कुणबी प्रमाणपत्राची लाभार्थ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच केली होळी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com