Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : ...तर दहा मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा, मुंबईचा 'प्लॅन' सांगतानाच जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना 'अलर्ट'ही केलं

Maratha Reservation Protest : मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेत आहे. मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणाची गरज पडणार नाही, असे सरकारमधील एका मंत्र्‍याने सांगितले होते. परंतु सरकार पुन्हा वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे मुंबईला जाण्याचा प्लॅन आखण्यासाठी येत्या 12 सप्टेंबरला सगळ्या मराठ्यांनी अंतरवाली सराटीत या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Jagdish Pansare

Maratha Reservation : मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेत आहे. मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषणाची गरज पडणार नाही, असे सरकारमधील एका मंत्र्‍याने सांगितले होते. परंतु सरकार पुन्हा वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे मुंबईला जाण्याचा प्लॅन आखण्यासाठी येत्या 12 सप्टेंबरला सगळ्या मराठ्यांनी अंतरवाली सराटीत या, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अंतरवालीमध्ये येणाऱ्या एकाही मराठा बांधवांवर पोलिसांनी एक काठी जरी उगारली आणि कुणाचे थेंबभर रक्त जरी सांडले, तर दहा मिनिटांत अख्खा महाराष्ट्र बंद पाडा, असं आवाहनवजा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

येत्या 12 तारखेला पुणे, नगर, नाशिक, तसेच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील मराठा समाजाने हातातली कामे टाकून अंतरवालीला बैठकीसाठी या. मराठा आरक्षणासंदर्भात आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. त्यांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही सरकारकडून हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. जर सरकारला मागण्यांचा विचार करायचा नसेल तर आता मराठा समाज हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही.

पोलिसांनी मराठा आंदोलकांना कितीही त्रास दिला तरी आपण त्यांना त्रास द्यायचा नाही. परंतु 12 तारखेच्या बैठकीला येताना हल्ल्याचा प्रयत्न झाला, कुणाच्या डोक्यातून थेंबभरही रक्त निघाले तर मराठा समाजाने 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडावा, असा आदेशच जरांगे पाटील यांनी दिला.

आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण मुंबईला जाणार हे नक्की. त्याच्या नियोजनासाठीच आपण अंतरवालीला बैठक बोलावली आहे. मात्र आपल्या मुंबईच्या रस्त्यात काटे पेरण्याचे सरकारचे नियोजन आहे. आपण मुंबईला निघू तेव्हा आपल्याला अडवण्याचा सरकारचा प्लॅन आहे, असा आरोप जरांगे यांनी केला.

शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने मराठ्यांसाठी काय केले? असे भारतीय जनता पक्षाचे लोक विचारतात. मला भाजपला विचारायचे आहे की तुम्ही आधी आमच्यासाठी काय केले? हे स्पष्ट करा, असे आव्हानही जरांगे पाटील यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT