BMC: विशाखा राऊतांनंतर BMCच्या ७९ नगरसेवकांचाही होणार 'करेक्ट कार्यक्रम'?, कोर्टात आव्हान याचिका; पालिकेत नेमकं काय सुरुए?

BMC Corporator: मुंबई महापालिकेतील ७९ बोगस नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. याबाबत काय संकेत मिळत आहेत जाणून घेऊयात
BMC
BMC Sarkarnama
Published on
Updated on

BMC Corporator: मुंबई महापालिकेची यंदाची निवडणूक ही अनेक कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. यामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले, अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली. तसंच पहिल्यांदाच भाजप स्वबळावर महापालिकेत सत्तेत आली. पण आता सर्वाधिक संख्येनं नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता असल्यानं या कारणासाठीही ही निवडणूक चर्चेत आली आहे.

विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर राहिलेल्या आणि सध्या मुंबई महापालिकेत नगरसेविका म्हणून सलग ४ वेळा निवडून आल्या आहेत. पण यंदा निवडून येऊनही त्यांना आपलं पद गमवावं लागलं आहे. कारण आजवर त्यांनी खुल्या गटातून निवडणूक लढवली होती पण यंदा पहिल्यांदाच त्यांनी ओबीसी जात प्रमाणपत्र जोडून निवडणूक लढवली. पण त्यांचं कुणबी प्रमाणपत्र हे जात पडताळणीत फेटाळलं गेलं. त्यामुळं त्यांची नगरसेविका म्हणून नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

BMC
Smriti Irani: राहुल गांधींच्या दणक्यानंतर भाजपच्या दिग्गज नेत्यावर आली होती दुसरं काम शोधण्याची वेळ; स्वतःच केला गौप्यस्फोट

महापालिकेतील इतर नगरसेवकांचं काय?

मुंबई महापालिकेतील ७९ नगरसेवकांविरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या आहेत. नियमांचा भंग करुन निवडणुका लढवून हे नगरसेवक झाले असल्याच्या तक्रारी या याचिकांमधून करण्यात आल्या आहेत. यामध्ये पडताळणीनंतर ५ नगरसेवकांवर अपात्रतेच्या कारवायाही करण्यात आल्या आहेत. पण अद्याप उर्वरित ७४ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मुंबई महापालिकेच्या विधी खात्यातून रितसर अर्ज करुन मिळवली आहे.

नेमक्या तक्रारी काय?

या नगरसेवकांनी निवडणुकीचे अर्ज दाखल करताना त्यात माहिती लपवली आहे. यामध्ये संपत्तीची माहिती, गुन्हे दाखल असल्याची माहिती लपवणे अशा गोष्टींचा समावेश आहे. त्याचबरोबर अनेक नगरसेवकांनी जात प्रमाणपत्र पडताळणी न करताच अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळं त्यांच्या जातीचे दाखले हे देखील बनावट असल्याचे आरोप याचिकांमधून करण्यात आले आहेत. विशेषतः या नगरसेवकांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवारांकडूनच हे आक्षेप घेण्यात आले आहेत.

BMC
Ganeshotsav News : गणेशोत्सवाच्या तोंडावर कंत्राटदारांसह चाकरमान्यांसाठी खुशखबर! रखडलेल्या कामांच्या बिलांचा मार्ग मोकळा; रस्त्यांचीही होणार दुरुस्ती

सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे

धक्कादायक बाब म्हणजे अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या नगरसेवकांमध्ये सर्वाधिक नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत. त्यांची संख्या २२ असून भाजपचे १६, शिंदेंच्या शिवसेनेचे ७, काँग्रेसचे १०, एमआयएमचे ३ आणि मनसेच्या २ नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. पण यामध्ये ठाकरेंचे सर्वाधिक नगरसेवक आहेत, त्यांच्याविरोधातील दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार हे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यामुळं महापालिकेतील चित्र येत्या काळात बदलू शकतं. सध्या मुंबई महापालिकेत भाजपनंतर (८९) दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक (६५) हे ठाकरेंचे तर शिंदेंचे २९ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस चौथ्या क्रमांकावर (२४) आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com