Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : चोवीसचा प्लॅन सतराला अंतरवालीत ठरणार..

Marathwada News : निष्पाप मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना तुरुंगात डांबून ठेवणे हे प्रकार मराठा समाज विसरणार नाही.

Jagdish Pansare

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली 24 डिसेंबरची डेडलाईन जवळ आली आहे. मराठ्यांच्या सापडलेल्या नोंदी आणि त्या आधारे कुणबी प्रमाणपत्रावर ओबीसीतून आरक्षण देण्याचा शब्द सरकारने मराठा समाजाला दिला आहे. (Manoj Jarange Patil News) येत्या 24 तारखेपर्यंत तो पाळावा. मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार, याचा मला विश्वास आहे. सरकारच्या वतीने मला फोनही आला आहे, यावेळी मी त्यांना दिलेला शब्द पाळा आणि आरक्षण 24 तारखेच्या आधी द्या, अशी मागणी केली आहे.

पण जर सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर 24 नंतरच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी उद्या दि.17 रोजी अंतरवाली सराटीत समस्थ मराठा समाजाची महत्वाची बैठक घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून सुटी मिळण्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (Maratha Rservation) त्यामुळे चोवीसचा प्लॅन सतराच्या अंतरवाली येथील बैठकीत ठरणार असून याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणासाठीचा लढा निर्णायक वळणावर पोहचला आहे. (Jalna) सरसकट मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत, तर ओबीसीतून मराठा आरक्षण द्यायला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे. यावरून गेल्या महिनाभरापासून राज्यातील वातावरण तापले आहे. ओबोसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात एल्गार सभा आणि त्यातून जरांगे पाटील यांच्यावर टीका होतांना दिसते आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर उद्या अंतरवालीत होणाऱ्या मराठा समाजाच्या बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या शब्दाची आठवण करून देत आश्वासनाची पुर्तता करण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजातील निर्दोष तरुणांवर बीड, अंतरवालीतील दगडफेक प्रकरणी दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या, सत्ता हातात आहे म्हणून खोट्या गुन्ह्यांमध्ये मराठ्यांच्या पोरांना अडकवू नका, तुमच्याबद्दल समाजात रोष निर्माण होत आहे.

आज तुमच्या हाती सत्ता आहे, पण उद्या आमची वेळ येणार आहे, असा गर्भित इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला. मराठा समाजाने हिंसेचे समर्थन केलेले नाही, पण शेकडोने निष्पाप मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करणे, त्यांना बावीस बावीस दिवस तुरुंगात डांबून ठेवणे हे प्रकार मराठा समाज विसरणार नाही.

कुणाच्या सांगण्यावरून सरकारने हे प्रकार करू नयेत, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले. छगन भुजबळांनी मराठ्यांच्या नादाला लागू नये, आपलेआपले पहावे, असा सल्लाही जरांगे यांनी त्यांना दिला. मराठा समाजाच्या शासकीय नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे आता आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, असेही जरांगे यांनी निक्षूण सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT